Elec-widget

डॉ. काशिनाथच्या ट्रेलर लाँचमध्ये दिसली 50 वर्षांपूर्वीची रंगभूमी

मराठी रंगभूमीचे अष्टपैलू व्यक्तिमत्त्व असलेले काशिनाथ घाणेकरांच्या जीवनावर आधारित सिनेमाची चर्चा सर्वत्र रंगत आहे. या सिनेमाच्या ट्रेलर लाँच कार्यक्रमात काशिनाथ घाणेकरांनी केलेल्या नाटकांच्या पाट्या या लक्ष वेधून घेणाऱ्या होत्या. (फोटो : विराज मुळे)

  • Share this:

मराठी रंगभूमीचे अष्टपैलू व्यक्तीमत्व असलेले काशिनाथ घाणेकर यांच्या जीवनावर आधारित सिनेमाची चर्चा सर्वत्र रंगत आहे. शुक्रवारी आणि काशिनाथ घाणेकर चित्रपटाचा ट्रेलर लाँच झाला. ट्रेलर लाँच कार्यक्रमात काशिनाथ घाणेकरांनी केलेल्या नाटकांच्या पाट्या लक्ष वेधून घेणाऱ्या होत्या.

प्रसिद्ध लेखक श्री. ना. पेंडसे यांच्या गारंबीचा बापू कादंबरीवर आधारित नाटकाने काशिनाथ घाणेकरांची अभिनयाला सुरूवात झाली. या नाटकाचे अनेक प्रयोग झाले. काशीनाथ घाणेकरांनी रंगभूमीवर प्रवेश केला पण त्यांच्या अभिनयाला लाल्या या भुमिकेपासून प्रसिद्धी मिळू लागली.

‘रायगडाला जेव्हा जाग येते’ या नाटकातील काशिनाथ यांची संभाजींची भूमिका मराठी रंगभूमीवर खूप गाजली. काशिनाथ घाणेकर यांच्या पोस्टरवरून नाट्यगृहात गर्दी होऊ लागली.

 श्री. ज. जोशींच्या कादंबरीवर आधारित आनंदी गोपाळ या नाटकाला लोकांनी प्रचंड पसंती दिली. डॉ. आनंदीबाई गोपाळ जोशी यांच्या जीवनावर आधारित आता सिनेमा येणार असल्याची चर्चा आहे.

Loading...

इथे ओशाळाला मृत्यू हे नाटक संभाजीराजेंचे हाल करून औरंगजेबाने घडवलेला मृत्यू यावर आधारित आहे. अत्यंत दु:खद घटनेवर आधारित नाटकातील प्रत्येक प्रसंग आणि काशिनाथ यांची भूमिका मनाला स्पर्श करणारी आहे.

ट्रेलर लाँच कार्यक्रमात शिवाजी मंदिर नाट्यगृहाचा सेट उभारुन त्यात सिनेमातील कलाकारांनी साकारलेल्या भूमिकांचे पोस्टर लावण्यात आले. आणि डॉ. काशिनाथ घाणेकरांचे काही जुने फोटो लावण्यात आले.

अभिनेत्री सोनाली कुलकर्णीने डॉ. काशिनाथ घाणेकर सिनेमातील सुलोचना दीदी यांची भूमिका साकारली आहे.

सुमित राघवन यांनी नटसम्राट श्रीराम लागू यांची भूमिका साकारली आहे. ज्यात श्रीराम लागू आणि काशिनाथ घाणेकर यांच्यातील रंगभूमीवरील स्पर्धा दिसून येणार आहे

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला आणि टि्वटरवर फाॅलो करा

First Published: Oct 20, 2018 01:40 PM IST
Loading...

ताज्या बातम्या

Loading...
Listen to the latest songs, only on JioSaavn.com