सुवर्णकमळ मिळालेल्या कासव चित्रपटाला मुंबईत एकच शो

सुवर्णकमळ मिळालेल्या कासव चित्रपटाला मुंबईत एकच शो

मुंबईतील सिटीलाईट या एकाच थिएटरमध्ये दुपारी 3.00 चा एकच शो या सिनेमाला मिळालाय. म्हणजेच प्राईम टाईमचा शोही या सिनेमाला मिळू शकलेला नाही.

  • Share this:

06 आॅक्टोबर : सुवर्णकमळ विजेता कासव हा सिनेमा रिलीज झालाय. पण हा सिनेमा मुंबईत अवघ्या एका स्क्रीनवर रिलीज करण्याची वेळ निर्मात्यांवर आलीय.  मुंबईतील सिटीलाईट या एकाच थिएटरमध्ये दुपारी 3.00 चा एकच शो या सिनेमाला मिळालाय. म्हणजेच प्राईम टाईमचा शोही या सिनेमाला मिळू शकलेला नाही.

पुणे अंतरराष्ट्रीय चित्रपट महोत्सव आणि काही अांतरराष्ट्रीय चित्रपट महोत्सवांमध्येही कासव हा सिनेमा नावाजला गेलाय. आज एकाच दिवशी 7 मराठी सिनेमे रिलीज झाल्याचा फटका या सिनेमाला सहन करावा लागलाय. खरं तर मुंबई पुण्यातील निवडक 20 थिएटर्समध्येच हा सिनेमा रिलीज झालाय. त्यात मुंबईत सिटीलाईट या एकाच थिएटरचा समावेश आहे.

First published: October 6, 2017, 6:10 PM IST

ताज्या बातम्या

corona virus btn
corona virus btn
Loading