मुंबई, 06 एप्रिल : एकता कपूरची मालिका 'कसौटी जिंदगी की 2' मध्ये भाऊ-बहिणीच्या भूमिकेतील पार्थ समथान(अनुराग बासु) आणि पूजा बॅनर्जी (निवेदिता) सध्या एका लिप लॉक व्हिडीओमुळे चर्चेत आहेत. हे दोन्ही कलाकार एकता कपूरची वेब सीरिज 'कहने को हमसफर है' मध्ये लिप लॉक किस करताना दिसणार आहेत. त्यापूर्वी या दोघांचाही किसींग सीनचा व्हिडीओ सध्या सोशल मीडियावर व्हायरल झाला आणि या व्हिडीओमुळे या दोघांवरही नेटीझन्सनी जोरदार टीका करायला सुरुवात केली आहे.
नेटीझन्सच्या मते एकता कपूरच्या एका शोमध्ये भाऊ-बहिणीची भूमिका साकारणारे कलाकार दुसऱ्या एका शोमध्ये लिपलॉक सीन कसा काय करू शकतात. यावरून नेटीझन्सनी पार्थ आणि पूजाला सोशल मीडियावर ट्रोल करायला सुरुवात केली. एका युझरनं लिहिलं, 'एका मलिकेत भाऊ-बहिण आणि दुसऱ्या मालिकेत प्रेमी हे खूप विचित्र आहे.' सोशल मीडियावरील लोकांचा राग पाहिल्यावर पूजानं आपलं मत मांडलं. ती म्हणाली, मला माहित आहे, आमचा अशाप्रकारचा सीन पाहिल्यावर सर्वांनाच धक्का बसला असेल. ऑनस्क्रीन माझा हा पहिला किसींग सीन आहे. पार्थ आणि मी 'कसौटी जिंदगी की 2' मालिकेत भाऊ-बहिणीची भूमिका साकारत आहे. पण रिअल लाइफमध्ये आम्ही भांवड नाही. आम्हा दोघांमध्ये एक चांगलं बाँडिंग आहे.
पूजा पुढे म्हणाली, शेवटी आम्ही दोघंही कलाकार आहोत आणि आम्हाला आमच्या भूमिकांप्रमाणे अभिनय करावा लागतो. चांगले प्रयत्न आणि प्रामाणिकपणे काम करून मला आनंद मिळतो. त्यामुळे चाहत्यांनी समजून घ्यायला हवं की आम्ही खऱ्या आयुष्यात भावंडं नाही आहोत.
मालिका 'कसौटी जिंदगी की 2'मध्ये सध्या हाय व्होल्टेज ड्रामा पाहायला मिळत आहे. कोमोलिका अनुराग आणि प्रेरणाला वेगळं करण्याचा पूर्ण प्रयत्न करत असून तिनं प्रेरणाकडून घटस्फोटाच्या पेपर्सवर सही करून घेतली आहे. तर प्रेरणा आता तेच पेपर शोधत आहे. सध्या ही मालिका टीआरपीच्या यादीत नंबर वन बनली आहे.
VIDEO: नववर्षाचा जल्लोष; उर्मिला मातोंडकर यांनी लेझीमच्या तालावर धरला ठेका