माझ्या नवऱ्याची बायको! बिपाशानं सुचवला पती करणच्या पत्नीचा ब्रायडल लुक

माझ्या नवऱ्याची बायको! बिपाशानं सुचवला पती करणच्या पत्नीचा ब्रायडल लुक

बिपाशा बासू आणि करण सिंग ग्रोवर यांनी 2016 मध्ये लग्न केलं असून सध्या करण 'कसौटी जिंदगी की 2'मध्ये मिस्टर बजाजची भूमिका साकारत आहे.

  • Share this:

मुंबई, 13 जुलै : स्टार प्लसवरील लोकप्रिय मालिका ‘कसौटी जिंदगी की 2’ मध्ये सध्या अनपेक्षित वळण आलं आहे. मालिकेत आता प्रेरणा आणि मिस्टर बजाज यांचं लग्न झालं आहे. मात्र या सर्वात प्रेरणाचा ब्रायडल लुक मात्र सर्वांच्या नजरेत भरला. या लग्नात प्रेरणा म्हणजेच अभिनेत्री एरिका फर्नांडिस बंगाली ब्रायडल लुकमध्ये दिसणार आहे. मात्र यामागे एका खास व्यक्तीचं योगदान होतं ज्यामुळे एरिकाचा ब्रायडल लुक कौतुकाचा विषय ठरला. तिचा बंगली ब्रायडल लुक अगोदरच ठरवण्यात आला होता मात्र मिस्टर बजाज म्हणजेच अभिनेता करण सिंग ग्रोवरची रिअल लाइफ पत्नी बिपाशा बासूनं त्यात काही बदल सुचवले ज्यामुळे एरिका परफेक्ट बंगाली ब्राइड दिसली.

सूत्रांच्या माहितीनुसार मेकर्सनी करण सिंग ग्रोवरची रिअल लाइफ पत्नी बिपाशाच्या ब्रायडल लुकप्रमाणे ठरवला होता. मात्र बिपाशानं त्यात काही बदल सुचवले आणि काही स्टायलिश टिप्स दिल्या. ज्यामुळे एरिकाला परफेक्ट बंगाली ब्रायडल लुकमध्ये तयार करणं सोप्पं गेलं. या मालिकेमध्ये येत्या काळात बरीच अनपेक्षित वळणं आलेली पाहायला मिळाणार आहेत.

VIDEO : निया शर्माचा आगीशी खेळ, पाहा काय झाली अवस्था

येत्या भागात, प्रेरणा आणि मिस्टर बजाज लग्नानंतर हनीमूनसाठी स्वित्झर्लंडला रवाना होणार आहेत. तर दुसरीकडे प्रेरणाच्या लग्नाची माहिती मिळताच अनुराग दुःखी होणार आहे आणि आपल्या मृत्यूची अफवा पसरवून तो मिस्टर बजाजचा बदला घेण्यासाठी स्वित्झर्लंडला रवाना होणार आहे. स्वित्झर्लंडला अनुराग आणि प्रेरणा एकमेकांसमोर येणार आहेत. प्रेरणा आपल्याशी असं का वागली हे त्याला जाणून घ्यायचं आहे. मात्र प्रेरणा त्याच्याशी खूप तुटकपणे वागताना दिसणार आहे. ज्यामुळे अनुराग तिचा तिरस्कार करणं सुरु करेल.

कानातून रक्त येत असतानाही ऐश्वर्यानं डान्स न थांबवता पूर्ण केलं शूटिंग!

 

View this post on Instagram

 

Here is another one! #prernasharma #kasautiizindagiikay #ejf #ericafernandes

A post shared by ERICA JENNIFER FERNANDES (@iam_ejf) on

या मालिकेला रंजक बनवण्याचा मेकर्सनी पुरेपुर प्रयत्न केला आहे. मात्र प्रेक्षकांनी मालिकेतील हा ट्विस्ट फारसा आवडलेला नाही. यावरून लोकांनी प्रोड्युसर एकता कपूरला ट्रोल करायला सुरूवात केली आहे. लोकांना प्रेरणाचं लाचार होऊन मिस्टर बजाजची अट मान्य करणं प्रेक्षकांना अजिबात आवडलेलं नाही. त्यांच्या मते प्रेरणानं मिस्टर बजाजना सडेतोड उत्तर द्यायला हवं होतं.

डीजीपीचा दावा श्रीदेवींची झाली हत्या, पती बोनी कपूरने दिली प्रतिक्रिया

======================================================================

SPECIAL REPORT : श्रीदेवीचा खून झाला असेल तर तो का आणि कशासाठी?

First published: July 13, 2019, 2:41 PM IST

ताज्या बातम्या

corona virus btn
corona virus btn
Loading