'कसोटी जिंदगी की'च्या सिक्वेलचा प्रोमो पाहिलात का?

'कसोटी जिंदगी की'च्या सिक्वेलचा प्रोमो पाहिलात का?

एकता कपूरने जेव्हा ती 'कसोटी जिंदगी की'चा सिक्वेल काढणार आहे असं सांगितलं तेव्हापासून लोकांमध्ये उत्सुकता वाढली आहे.

  • Share this:

मुंबई, 23 जुलै : एकता कपूरने जेव्हा ती 'कसोटी जिंदगी की'चा सिक्वेल काढणार आहे असं सांगितलं तेव्हापासून लोकांमध्ये उत्सुकता वाढली आहे. आता नवीन कसोटीमध्ये प्रेरणा, अनुराग आणि कोमोलिकाची भूमिका कोण साकारणार याकडे सर्वांचं लक्ष लागून राहिलं होतं. अशा वेळी अनेक जणांची नावं पुढे आली.

पण ही मालिका एरिका फर्नांडिस आणि पार्थ सामंथन यांनी आपल्या खिशात टाकली आहे.  एरिकाने यापूर्वी 'कुछ रंग प्यार के ऐसे भी' या मालिकेतून तुमचं मनोरंजन केलं तर पार्थने 'कैसी ये यारीयाँ' ही मालिका केली होती. या मालिकेत एरिका तुम्हाला प्रेरणा म्हणजेच श्वेता तिवारी आणि पार्थ तुम्हाला अनुराग म्हणजेच सिझॅन खान यांच्या भूमिकेत दिसणार आहेत.

Love never dies!!! When u think it’s over it RETURNS ! Here it is KASAUTI ZINDAGI KAY! @starplus @balajitelefilmslimited

A post shared by Ekta❤️myVEERES (@ektaravikapoor) on

नवा चित्रपट असो वा नवी मालिका त्याबद्दल तुम्हाला फोटोद्वारे माहिती दिली जाते. म्हणजे त्या सिनेमा अथवा मालिकेचा पहिला लूक कसा असेल, त्यामध्ये मुख्य भूमिकेत कोण असणार आहे हे आपल्याला त्या फोटोवरून कळतं. पण यावेळी एकता कपूरने तिच्या मालिकांच्या मुख्य पात्रांची ओळख ही फोटोद्वारे न करता  सरळ व्हिडिओतून केलीय. हे टिझर तिने ट्विटरवर शेयर केलं असून प्रेम कधीही संपत नाही आणि जेव्हा ते संपलंय असं वाटतंय तेव्हा ते पुन्हा परत येतं अशी टॅग लाईनसुद्धा दिली आहे. या व्हिडिओमध्ये संगीत हे जुन्या मालिकेचंच आहे पण ते नवीन कलाकारांसोबत चित्रित केलंय.

हा प्रोमो पाहून श्वेता तिवारी आणि रोनित रॉय यांनी आपल्या भावना ट्विटरच्या माध्यमातून व्यक्त केल्या. हे दोघेही या मालिकेतला महत्त्वाचा भाग होते. श्वेताने अभिनंदन करत टायटल ट्रॅक अतिशय चांगले बनले आहे अशी प्रतिक्रिया दिली. आणि रोनित रॉयने या मालिकेतील येणाऱ्या वाटचालींसाठी ऑल दि बेस्ट म्हटलंय. त्याचबरोबर ही मालिका त्याच्या हृदयाच्या खूप जवळची होती आणि या सिक्वेलमुळे त्याच्या इतकं आनंदी कोणीच झालं नसेल असे त्याने म्हटलं आहे. त्याने या मालिकेत एखादा छोटासा रोल मिळेल का असे देखील विचारले आहे.

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला आणि टि्वटरवर फाॅलो करा

First Published: Jul 23, 2018 05:30 PM IST

ताज्या बातम्या