मुंबई, 22 नोव्हेंबर : ‘बिग बॉस’ मराठी प्रमाणेच सध्या हिंदी बिग बॉसच्या घरातसुद्धा अनेक घडामोडी घडत आहेत. यंदाचं हे 16 वं पर्व सध्या फारच गाजतंय. या घरात रोज काही ना काही वाद होत असतात. या वादात रागाच्या भरात केल्या गेलेल्या वक्तव्यांमुळे अनेक स्पर्धक चर्चेचा विषय ठरतात. बिग बॉस हिंदीच्या घरात ताजाकिस्तानी गायक अब्दु रोजिक हा सलमान खानच्या रिअॅलिटी शो 'बिग बॉस 16' मधील सर्वात आवडत्या स्पर्धकांपैकी एक आहे. अब्दू परदेशी असूनही तो भारतीय प्रेक्षकांना खूपच आवडला आहे. त्याच्या चाहत्यांच्या यादीत सेलिब्रिटींचाही समावेश झाला आहे. मात्र, नुकत्याच झालेल्या एपिसोडमध्ये एक टीव्ही अभिनेत्री अब्दू रोजिकच्या वागण्याने चांगलीच संतापली आहे. त्यामुळे तिने ट्विट करून बिग बॉसच्या निर्मात्यांवर आपली नाराजी व्यक्त केली आहे.
बिग बॉसच्या खेळावर सामान्य प्रेक्षकांसहित माजी स्पर्धकांचं सुद्धा चांगलाच लक्ष असतं. वेळोवेळी ते बिग बॉसच्या घरातील खेळावर आपलं मत व्यक्त करत असतात. याआधी अभिनेत्री गौहर खानने बिग बॉसच्या खेळावर आणि स्पर्धकांवर आपलं मत सांगितलं होतं. आता अभिनेत्री उर्वशी ढोलकियाने ट्विट करत एका स्पर्धकावर निशाणा साधला आहे. 'कसौटी जिंदगी की'मध्ये कोमोलिकाची भूमिका करून प्रसिद्ध झालेली उर्वशी ढोलकिया प्रत्येक मुद्द्यावर आपले मत व्यक्त करते. ही अभिनेत्री 'बिग बॉस 6' ची विजेती देखील आहे. अशा परिस्थितीत ती नेहमीच बिग बॉसमधील स्पर्धकांच्या खेळावर आपले मत मांडते. नुकतीच तिने बिग बॉसच्या घरातील सर्वात लोकप्रिय स्पर्धक अब्दु रोजिकच्या खेळावर आपली प्रतिक्रिया दिली.
हेही वाचा - Shahrukh khan: शाहरुख खानच्या 'मन्नत' बाहेर हिऱ्यांची नेमप्लेट? गौरी खानने सांगितलं सत्य
उर्वशी ढोलकियाने ट्विटरवर अब्दू रोजिकच्या खेळावर नाराजी व्यक्त केली आणि बिग बॉसच्या निर्मात्यांना पक्षपाती म्हटले. तिने ट्विट करत म्हटले आहे कि, “अब्दू हे टास्क करण्यास सतत नकार देत होता आणि संपूर्ण गेम अंकितवर चालू झाला कारण त्याने गेम सोडला. असं कसं? बिग बॉस तुमची तब्येत ठीक नाहीये का? कृपया स्वतःला तपासा! काय मूर्खपणा आहे हा." यासोबत त्याने कलर्सलाही टॅग केले आहे.
Abdu kept refusing the tasks & the whole game turned on Ankit about quitting will fully???? How ??? Bigg boss are u unwell ?? Pls get urself checked!! Kya bakwaas hai @ColorsTV @justvoot
— Urvashi Dholakia (@Urvashi9) November 21, 2022
बिग बॉस 16 च्या शेवटच्या एपिसोडमध्ये कॅप्टन्सी टास्क संदर्भात एक गेम होता. अंकित गुप्ता नुसता बसून अब्दू रोजिकला टास्क देत होता. ते टास्क करायला मात्र अब्दू आणि साजिद खान वारंवार नकार देत होते. अनेक वेळा टास्क नाकारल्यानंतर अंकित गुप्ता रागावला आणि त्याने गेम खेळण्यास नकार दिला. नंतर साजिद खान बरोबर खेळात नाहीये या गोष्टीवरून बराच गदारोळ झाला होता. आता उर्वशीने याच गोष्टीवरून बिग बॉस आणि अब्दुवर निशाणा साधला आहे.
दरम्यान बिग बॉसच्या घरातील स्पर्धकांमध्ये टास्कनंतर शालीन भानोत, टीना दत्ता आणि सौंदर्या शर्मा यांना अब्दू रोजिक आणि शिव ठाकरे यांच्यातील एकाला घराचा कॅप्टन निवडण्याची संधी मिळाली. सुरुवातीला, सौंदर्या आणि टीना अब्दूला कॅप्टन बनवण्यास सहमती देतात,परंतु शालीन शिव ठाकरेला पाठींबा देतो आणि शिव ठाकरे या आठवड्याचा कॅप्टन झाला आहे.
मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.
Tags: Bigg boss, Entertainment, Tv actress