Home /News /entertainment /

जिंदगी का सफर...कार्तिकी गायकवाडचा WEDDING VIDEO; स्वत: सांगतेय लग्नाची गोष्ट

जिंदगी का सफर...कार्तिकी गायकवाडचा WEDDING VIDEO; स्वत: सांगतेय लग्नाची गोष्ट

'जिंदगी का सफर' हे गाणं स्वत: कार्तिकी गायकवाडने (Kartiki Gaikwad) गायलं आहे. या म्युझिक व्हिडीओमध्ये तिच्या हळदीपासून ते लग्नापर्यंत सर्व विधी दाखवण्यात आले आहेत.

  मुंबई, 22 डिसेंबर: लिटील चॅम्प्स फेम कार्तिंकी गायकवाडचं (Kartiki Gaikwad) लग्न नुकतंच थाटामाटात पार पडलं. झी मराठीवरील लिट्ल चॅम्पस या कार्यक्रमामधून कार्तिकी पुढे आली. कार्तिकीला गाण्याचा वसा तिच्या वडिलांकडून मिळाला होता. कार्तिकीचे वडील कल्याणजी गायकवाड स्वत: उत्तम गायक आणि संगीतकार आहेत. रोनित पिसे (Ronit Phise) असं कार्तिकीच्या पतीचं नाव आहे. कार्तिकीच्या लग्नाच्या व्हिडीओ नुकताच प्रदर्शित झाला आहे. काय आहे कार्तिकीच्या वेडिंग व्हिडीओमध्ये? जिंदगी का सफर.. अब तेरे साथ में हे गाणं कार्तिकीने स्वत: गायलं आहे. तिचा भाऊ कौस्तुभ गायकवाडने तिचा गाण्यात उत्तम साथ दिली आहे. या गाण्याचा गीतकार आणि संगीतकारही कौस्तुभ गायकवाडच आहे. हळदीपासून ते अगदी लग्नापर्यंतचे सगळे विधी या गाण्यात दाखवण्यात आले आहेत. या म्युझिक व्हिडीओला चाहत्यांचा भरभरुन प्रतिसाद मिळत आहे. या व्हिडीओला आत्तापर्यंत 74 हजारांपेक्षा जास्त व्ह्यूज मिळाले आहेत. कार्तिकीने इन्स्टाग्रामवर तिचा आणि रोनितचा फोटो शेअर करत चाहत्यांना तिच्या नव्या गाण्याबद्दल सांगितलं. संपूर्ण महाराष्ट्रात कार्तिकीचा चाहतावर्ग आहे. कार्तिकीच्या लग्नाची उत्सुकता तिच्या अनेक चाहत्यांना होती. आता या म्युझिक व्हिडीओमधून चाहत्यांना तिचं लग्न पाहता येणार आहे. रोनित पेशाने मॅकॅनिकल इंजिनिअर आहे. त्याचा स्वत:चा व्यावसाय आहे. 26 जुलै  2020 रोजी त्यांचा साखरपुडा पार पडला होता. रोनित हा कार्तिकीच्या वडीलांच्या मित्राचाच मुलगा आहे. मोजक्याच पाहुण्यांच्या उपस्थितीमध्ये कार्तिकीचा विवाहसोहळा पार पडला.
  लिटील चॅम्प्समध्ये स्पर्धक म्हणून सहभागी झालेली असताना तिने विविध बाजाची गाणी म्हटली होती. पण अभंग, गवळणी गाताना तिचा आवाज अधिकच खुलायचा. गजर किर्तनानाचा या कार्यक्रमामध्ये ती निवेदिका म्हणूनही समोर आली आहे.
  Published by:Amruta Abhyankar
  First published:

  Tags: Marathi entertainment

  पुढील बातम्या