Home /News /entertainment /

Kartik Aryan ला निगेटिव्ह न्यूजची नाही चिंता; म्हणाला 'माझ्याबद्दल इतकं वाईट लिहिलं...

Kartik Aryan ला निगेटिव्ह न्यूजची नाही चिंता; म्हणाला 'माझ्याबद्दल इतकं वाईट लिहिलं...

kartik Aaryan

kartik Aaryan

नुकत्याच दिलेल्या एका मुलाखतीत कार्तिकने सांगितलं की, त्याच्याविरूद्ध इतक्या नकारात्मक बातम्या लिहिण्यात आल्या की, आता त्याला या गोष्टींबाबत भीती वाटत नाही.

    मुंबई,4 जानेवारी-   अभिनेता कार्तिक आर्यन  (Kartik Aaryan negative news)   हे नावं आता बॉलिवूडमध्ये  (Bollywood)  चांगलंच प्रसिद्ध आहे. कार्तिक हा त्याच्या ‘धमाका’  (Kartik Aaryan Dhamaka)  चित्रपटाला मिळालेल्या यशामुळे अगदी खूश आहे. हा चित्रपट नेटफ्लिक्स  (Netflix)  या ओटीटी प्लॅटफॉर्मवर रिलीज झाला होता. या चित्रपटातील कार्तिकच्या अभिनयाने त्याचे चाहते फारच प्रभावित झाले आणि त्यांनी कार्तिकच्या अभिनयाचं खूप कौतुकही केलं. पण कार्तिक आर्यनसाठी गेलं वर्ष तितकसं सोपं नव्हतं. कारण अनेक वादविवादांमध्ये त्याचं नाव गोवण्यात आलं होतं. नुकतंच दिलेल्या एका मुलाखतीत कार्तिकने सांगितलं की, त्याच्याविरूद्ध इतक्या नकारात्मक बातम्या लिहिण्यात आल्या की, आता त्याला या गोष्टींबाबत भीती वाटत नाही. कार्तिकला 2021मध्ये ‘दोस्ताना 2’ या चित्रपटातून काढण्यात आलं त्यामुळे सतत तो चर्चेत होता. खरं तर कार्तिकने या चित्रपटाचं बरचसं शूटिंगही केलं होतं. करण जोहरसोबत वाद झाल्याच्या बातम्या- प्रसिद्ध बॉलिवूड दिग्दर्शक आणि ‘दोस्ताना 2’ चा निर्माता करण जोहर (Karan Johar) याच्याशी कार्तिकचा वाद झाल्याच्या बातम्या आल्या होत्या. त्यानंतर आलेल्या अनेक बातम्यांमध्ये असा दावा करण्यात आला होता की, कार्तिकला दुसऱ्या चित्रपटांमध्येही रिप्लेस करण्यात येत आहे. बॉलिवूड हंगामाला दिलेल्या मुलाखतीत कार्तिक आर्यनने या नकारात्मक बातम्यांबाबत सांगितलं की, ‘आता मला अशा बातम्यांमुळे फरक पडत नाही.’ नकारात्मक बातम्यांमुळे वाटायचं वाईट- कार्तिक म्हणाला होता की, ‘आधी मला खूप वाईट वाटायचं. मला माझ्या कुटुंबाला सामोरं जायचं होतं. कारण मग तेही चिंता करत असतं आणि माझ्याशी त्यांचा तणावही शेअर करत नसतं. मला हे सगळं जाणवत होतं. पण आता माझ्याबाबत इतक्या नकारात्मक कहाण्या सांगण्यात आल्या आहेत की, मला भीतीच वाटत नाही. खरं तर आता मला या सगळ्याचं हसू येतं आणि मला प्रेरणाही मिळते.’ कामाच्या माध्यमातून देणार उत्तर- कार्तिकने सांगतिलं की, ‘तो नकारात्मक बातम्यांवर प्रतिक्रिया देण्यापेक्षा आपल्या कामाच्या माध्यमातून उत्तर देणं पसंत करतो.’ त्याने हेही सांगितलं की, ‘मी गप्प बसतो आणि मग एक धमाका होतो आणि मग लोक माझं कौतुक करतात. त्यामुळे मी हसतो आणि झोपून जातो. या छोट्या छोट्या गोष्टी मला आनंद देतात. माझं कामच बोलेल. पुढे काय होणार, याची मला पर्वा नाही. मी फक्त सगळ्या गोष्टी नीट करण्यासाठी प्रेरित होतो.’ आता भविष्यात कार्तिक आर्यन कोणत्या चित्रपटातून अभिनयाचा धमाका करतो, हे पाहणं औत्सुक्याचं ठरेल.
    First published:

    Tags: Bollywood actor, Entertainment, Kartik aryan

    पुढील बातम्या