कार्तिक आर्यननं आईला गिफ्ट केली कार, किंमत ऐकूण व्हाल थक्क!

कार्तिक आर्यननं आईला गिफ्ट केली कार, किंमत ऐकूण व्हाल थक्क!

आईचा वाढदिवस खास बनवण्यासाठी कार्तिकने तिला खूपच स्पेशल गिफ्ट दिलं आहे.

  • Share this:

मुंबई, 18 जानेवारी : बॉलिवूडचा चॉकलेट बॉय कार्तिक आर्यन सध्या त्याचा आगामी सिनेमा ‘लव्ह आज कल’मुळे चर्चेत आहे. नुकताच या सिनेमाचा ट्रेलर रिलीज झाला ज्याला प्रेक्षकांचा संमिश्र प्रतिसाद पाहायला मिळत आहे. पण आणखी एका गोष्टीमुळे सध्या कार्तिकचं नाव चर्चेत आहे. कार्तिकची आई माला तिवारी यांचा 16 जानेवारीला वाढदिवस होता. आईचा वाढदिवस खास बनवण्यासाठी कार्तिकने तिला खूपच स्पेशल गिफ्ट दिलं आहे.

कार्तिकने त्याच्या आईला ‘मिनी कूपर’ कार गिफ्ट दिली आहे. या कारची किंमत तब्बल ४० लाख रुपये असून कार गिफ्ट केल्यानंतर कार्तिक आणि त्याची आई दोघेही लाँग ड्राइव्हवर जाताना दिसले होते.

बॉलिवूडमध्ये येण्याआधी 'गे' व्यक्तीसोबत रिलेशनशिपमध्ये होती 'ही' अभिनेत्री

याशिवाय आईला वाढदिवसाच्या शुभेच्छा देत कार्तिकनं एक जुना फोटो त्याच्या इन्स्टाग्राम अकाऊंटवर शेअर केला. या लहानपणीच्या फोटोमध्ये कार्तिक खूपच क्यूट दिसत आहे. त्याच्या आईने त्याची छान हेअरस्टाईल देखील केली आहे. कार्तिकने फोटो शेअर करत ‘माझ्या आवडत्या हेअरस्टाइलिस्टला वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा, लव्ह यू आई’ असे कॅप्शन दिलं आहे.

Bigg Boss 13 : पारस छाब्रावर भडकला सलमान खान, सर्वांसमोर केली पोलखोल

 

View this post on Instagram

 

Happy Birthday to my Fav Hairstylist Love you 😘 Mummy ❤️

A post shared by KARTIK AARYAN (@kartikaaryan) on

कार्तिकच्या ‘लव्ह आज कल’बद्दल बोलायच तर या सिनेमात दोन वेगवेगळ्या काळातील कथा साकारण्यात आली आहे. ज्यात 90 व्या दशकातील भागात आरुषी शर्मा दिसत आहे तर मॉर्डन कहाणीमध्ये सारा अली खान आहे. सिनेमाचं दिग्दर्शन इम्तियाज अली यांनी केलं असून 2009 मध्ये आलेल्या त्यांच्या लव्ह आज कलचा हा दुसरा भाग आहे. यात सैफ अली खान आणि दीपिका पदुकोण यांच्या मुख्य भूमिका होत्या. हा सिनेमा बॉक्स ऑफिसवर हिट ठरला होता. सारा आणि कार्तिकचा लव्ह आज कल 14 फेब्रुवारीला रिलीज होत आहे.

नेहा-आदित्यचं लग्न झाल्यास उदित नारायण यांना होणार फायदा?

First published: January 18, 2020, 4:59 PM IST

ताज्या बातम्या

corona virus btn
corona virus btn
Loading