भुल-भुलैय्याच्या सेटवर कार्तिक-कियारा करत होते रोमान्स, लीक झाला VIDEO

भुल-भुलैय्याच्या सेटवर कार्तिक-कियारा करत होते रोमान्स, लीक झाला VIDEO

कियारा आणि कार्तिकचा रोमान्स करतानाचा एक व्हिडीओ लीक झाला असून सोशल मीडियावर खूप व्हायरल होत आहे.

  • Share this:

मुंबई, 29 फेब्रुवारी : बॉलिवूडचा चर्मिंग बॉय कर्तिक आर्यन सध्या त्याचा आगमी सिनेमा भुल-भुलैय्या सिनेमाच्या शूटिंगमध्ये बीझी आहे. या सिनेमात त्याच्यासोबत ‘कबीर सिंग’ फेम अभिनेत्री कियारा अडवाणी स्क्रीन शेअर करणार आहे. या सिनेमाचं शूटिंग सध्या जयपूरमध्ये सुरू आहे. पण आता या सेटवरील कियारा आणि कार्तिकचा रोमान्स करतानाचा एक व्हिडीओ लीक झाला असून सोशल मीडियावर खूप व्हायरल होत आहे.

सोशल मीडियावर व्हायरल होत असलेला हा रोमँटिक व्हिडीओ या सिनेमातील एक सीन आहे. यामध्ये कार्तिक कियाराला उचलून घेत गोल फिरवताना दिसत आहे. यामध्ये कार्तिक व्हाइट कुर्ता आणि ब्लॅक पायजमामध्ये तर कियारा सिल्व्हर शिमरी लेहंग्यात दिसत आहे. हा व्हिडीओ पाहिल्यावर लक्षात येत की या सिनेमात कार्तिक कियारा यांची सुपर रोमँटिक केमिस्ट्री पाहायला मिळणार आहे.

VIDEO: डान्स करताना अचानक आला आवाज आणि खटकन मोडलं अभिनेत्रीच्या पायचं हाड

 

View this post on Instagram

 

@kartikaaryan & @kiaraaliaadvani shooting for #Bhoolbhulaiyaa2 in jaipur today!!😍💕 . . . . . . . [#kartikaaryan #kiaraadvani #kartikians #kartikaryan #loveaajkal #dostana2 #followforfollowback #chintutyagi #kartikkiara #shooting #jaipur #kartikaaryan__universe ]

A post shared by KARTIK AARYAN FC👑 (@kartikaaryan__universe) on

काही दिवसांपूर्वी कार्तिकनं त्याच्या इन्स्टाग्रामवर त्याच्या ढोंगी बाबा लुकचा फोटो शेअर केला होता. हा सिनेमा अक्षय कुमारच्या भुलभुलैय्याचा दुसरा भाग आहे. या सिनेमातील कार्तिकचा फर्स्ट लुक रिलीज झाला आहे. त्यामुळे आता प्रेक्षकांना कार्तिक आर्यन अक्षय कुमराच्या रोलमध्ये फिट बसतो की याची उत्सुकता आहे.

फोटोग्राफरच्या पायावरुन गेली वरुण धवनची कार, पाहा अभिनेत्यानं काय केलं

कार्तिकच्या वर्कफ्रंट बद्दल बोलायचं तर काही दिवसांपूर्वीच सारा अली खानसोबत त्याचा ‘लव्ह आज कल 2’ रिलीज झाला होता. हा सिनेमा जेमतेम चालला असला तरीही या दोघांच्या केमिस्ट्रीचं खूप कौतुक झालं. ही जोडी त्यांच्या पर्सनल लाइफमुळे सतत चर्चेत राहिल्यानं दोघांच्या ऑनस्क्रीन केमिस्ट्रीची सर्वांना उत्सुकता होती. तर कियारा अडवाणीचे कबीर सिंह आणि गुड न्यूज हे दोन्ही सिनेमा खूप हिट झाले. त्यानंतर यंदा अक्षय कुमारसोबत लक्ष्मी बॉम्बमध्ये दिसणार आहे.

Bigg Boss 13 फेम पारस-माहिरा अडकले लग्नाच्या बेडीत? काय आहे Viral Photos चं सत्य

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला आणि टि्वटरवर फाॅलो करा

First Published: Feb 29, 2020 03:19 PM IST

ताज्या बातम्या