VIRAL VIDEO : ... आणि सर्वांसमोर अनन्या पांडेवर भडकला कार्तिक आर्यन

VIRAL VIDEO : ... आणि सर्वांसमोर अनन्या पांडेवर भडकला कार्तिक आर्यन

सध्या कार्तिक त्याचा आगमी सिनेमा ‘पति पत्नी और वो’च्या शूटिंगमध्ये बीझी आहे. या सिनेमाचं शूट सध्या लखनऊमध्ये सुरू आहे.

  • Share this:

मुंबई, 1 सप्टेंबर : अभिनेता कार्तिक आर्यन मागच्या काही दिवासांपासून सारा अली खानसोबतच्या नात्यामुळे चर्चेत आहे. या दोघांनीही त्यांच्या नात्याची कबूली दिली नसली तरी त्यांच्यातील खास बॉन्डिंग बरंच काही सांगून जातं. सध्या कार्तिक त्याचा आगमी सिनेमा ‘पति पत्नी और वो’च्या शूटिंगमध्ये बीझी आहे. या सिनेमाचं शूट सध्या लखनऊमध्ये सुरू आहे. या सिनेमात कार्तिक आर्यनसोबत अनन्या पांडे स्क्रीन शेअर करणार आहे. त्यामुळे हे दोघंही सध्या लखनऊला पोहोचले आहेत.याठीकाणच्या एका प्रसिद्ध टी स्टॉलला त्यांनी भेट दिली. यावेळी अनन्या असं काही वागली ज्यामुळे कार्तिक चक्क सर्वांसमोर तिच्यावर भडकला. त्यांचा हा व्हिडीओ सध्या सोशल मीडियावर व्हायरल होत आहे.

सोशल मीडियावर व्हायरल होत असलेल्या या व्हिडीओमध्ये कार्तिक आणि अनन्या एका टी स्टॉलवर उभे असलेले दिसत आहेत. यावेळी त्यांना कचोरी आणि चहा दिला जातो. चहा आणि कचोरी पाहिल्यावर कर्तिक खूश झालेला पाहायला मिळतो. तो अनन्याला चहा प्यायला सांगतो मात्र त्यावर ती मला चहापासून एलर्जी असल्याचं सांगताना दिसते. तिचं उत्तर ऐकून कार्तिक तिच्यावर काहीसा चिडलेला पाहायला मिळाला. तो तिला म्हणाला, एलर्जी आहे तर मग इथे आलीसच का? त्यावर अनन्या बोलते सो मीन.

बॉलिवूड डेब्यूनंतर आता रानू मंडल यांच्या जीवनावर होणार सिनेमाची निर्मिती?

 

View this post on Instagram

 

#kartikaaryan and #ananyapanday famous #sharmateastall of Lucknow 😉

A post shared by Viral Bhayani (@viralbhayani) on

कार्तिक आणि अनन्याचा हा व्हिडीओ सध्या सोशल मीडियावर चर्चेचा विषय ठरत आहे. यावर अनेक गंमतीशीर कमेंट पाहायला मिळत आहेत. एक युजरनं लिहिलं, ताई, चहाची एलर्जी आहे तर मग या जगात का आलीस तू. तर दुसऱ्या एका युजरनं लिहिलं, चहाची एलर्जी टिपिकल साउथ बॉम्बे ब्राट आहे. आमचा तर दिवसही सुरू नाही होत चहाशिवाय. कार्तिक आणि अनन्या पती पत्नी और वो या सिनेमात दिसणार आहेत. या सिनेमात त्यांच्यासोबत भूमि पेडणेकर सुद्धा दिसणार आहे.

अ‍ॅमी जॅक्सननं शेअर केले बेबी शॉवर PHOTO, ब्लू कलर थीम ठेवण्यामागे आहे 'हे' कारण

 

View this post on Instagram

 

Happy Birthday Princess @saraalikhan95 ❤️ And Eid Mubarak (this time without the mask )

A post shared by KARTIK AARYAN (@kartikaaryan) on

सारा अली खानसोबत लिंकअपच्या चर्चा सुरू होण्याअगोदर कार्तिक आणि अनन्यामध्ये जवळीक वाढल्याचं बोललं जात होतं. एका मुलाखतीत अनन्यानंही कर्तिकला डेट करायला आवडेल असं म्हटलं होतं. काही वेळा हे दोघं एकत्रही दिसले होते मात्र नंतर कार्तिकच्या आयुष्यात सारा आली आणि सध्या सारा आणि कार्तिक अनेक ठिकणी एकत्र दिसतात. शूटमधून वेळ काढून हे दोघं एकमेकांना भेटयला जातात. काही दिवसांपूर्वी कार्तिकच्या वडीलांना भेटायला सारा हॉस्पिटलमध्ये पोहोचली होती.

नवरी नटली…! आलिया भटचा ब्रायडल लुक सोशल मीडियावर VIRAL

============================================================

नाशिक मार्गावर कार-दुचाकीची धडक, बर्निंग बाईकचा थरारक VIDEO

First published: September 1, 2019, 3:56 PM IST

ताज्या बातम्या

corona virus btn
corona virus btn
Loading