मराठी बातम्या /बातम्या /मनोरंजन /कार्तिक आर्यनवर आली शाहिदचं घर रेंटवर घेण्याची वेळ; महिन्याचं भाडं एकून फुटेल घाम

कार्तिक आर्यनवर आली शाहिदचं घर रेंटवर घेण्याची वेळ; महिन्याचं भाडं एकून फुटेल घाम

शाहिद कपूर कार्तिक आर्यन

शाहिद कपूर कार्तिक आर्यन

अभिनेता कार्तिक आर्यन शाहीद कपूरच्या मुंबईतल्या जुहूमधल्या घरात राहायला जाणार आहे. कार्तिकने जुहूच्या तारा रोडवरच्या प्रणेता इमारतीतला एक फ्लॅट लीजवर घेतला आहे.

  • Trending Desk
  • Last Updated :
  • Mumbai, India

    मुंबई, 19 जानेवारी :    बॉलिवूड अभिनेते आणि अभिनेत्री त्यांच्या खासगी जीवनातल्या काही घडामोडी सोशल मीडियावर चाहत्यांसोबत शेअर करत असतात. आपला आवडता अभिनेता किंवा अभिनेत्रीचं खासगी जीवन कसं आहे, त्यांच्या जीवनात काय घडामोडी सुरू आहेत, हे जाणून घेण्याची चाहत्यांना खूप उत्सुकता असते. बऱ्याचदा अभिनेते आणि अभिनेत्री सोशल मीडियावर व्हिडिओच्या माध्यमातून त्यांचं घर, राहणीमान आदी बाबीही शेअर करत असतात. असे व्हिडिओ तुफान व्हायरल होतात. सध्या अभिनेता कार्तिक आर्यन आणि शाहीद कपूर यांच्याशी संबंधित एका गोष्टीची जोरदार चर्चा सुरु आहे. कार्तिकने शाहीदचं जुहूमधलं घर नुकतंच भाडेतत्त्वावर घेतलं आहे. या सी-फेसिंग फ्लॅटसाठी कार्तिक शाहीदला दरमहा साडेसात लाख रुपये भाडं देणार आहे. शाहीद, त्याची पत्नी मीरा राजपूत आणि त्यांची मुलं गेल्या वर्षापर्यंत या इमारतीत राहत होती.

    अभिनेता कार्तिक आर्यन शाहीद कपूरच्या मुंबईतल्या जुहूमधल्या घरात राहायला जाणार आहे. कार्तिकने जुहूच्या तारा रोडवरच्या प्रणेता इमारतीतला एक फ्लॅट लीजवर घेतला आहे. हा फ्लॅट शाहीद कपूरच्या मालकीचा आहे. गेल्या वर्षी शाहीद त्याच्या कुटुंबासह मुंबईत वरळीमधल्या नवीन ड्युप्लेक्समध्ये राहायला गेला आहे. त्यापूर्वी तो पत्नी मीरा आणि त्यांची मुलं झैन आणि मीशा कपूरसोबत या घरात राहत होता. कार्तिकने भाडेतत्त्वावर घेतलेलं घर सी-फेसिंग पेंटहाउस आहे. हे पेंटहाउस समुद्रकिनाऱ्यावर असून हिरवाईने नटलेलं आहे. या घरातून जुहू बीचची सुंदर दृश्यं दिसतात.

    हेही वाचा - Sonam Kapoor: सोनमच्या मुलाला पाहण्यासाठी तुम्हीही उत्सुक? अभिनेत्रीने अखेर सांगितलं कधी दाखवणार लेकाचा चेहरा

    जुलै 2018मध्ये शाहीद आणि मीरा यांनी प्रभादेवीत थ्री सिक्स्टी वेस्टच्या साउथ विंगमधला 8625 चौरस फूट डुप्लेक्स फ्लॅट 55.60 कोटी रुपयांना खरेदी केला होता. गेल्या वर्षी सप्टेंबरच्या सुमारास ते या अपार्टमेंटमध्ये राहायला गेले होते. दरम्यान, शाहीदचं जुहूतलं घर भाडेतत्त्वावर घेण्यापूर्वी कार्तिक आर्यन वर्सोव्यातल्या एका अपार्टमेंटमध्ये राहत होता. हे घर त्याने 2019मध्ये 1.60 कोटी रुपयांना खरेदी केलं होतं.

    मीरा राजपूतशी लग्न करण्यापूर्वी शाहीदने 2014मध्ये जुहूतलं घर खरेदी केलं होतं. त्याची मुलगी मीशा कपूरचा जन्म तिथे झाला. जुहू बीचचं सान्निध्य हे या इमारतीचं मुख्य आकर्षण आहे. प्रणेता इमारतीतला हा फ्लॅट 3681 चौरसफूट आहे. या इमारतीच्या कंपाउंडमध्ये दोन पार्किंग स्पेस आहेत. भाडेपट्टीच्या अटींनुसार दर वर्षी भाड्यात सात टक्क्यांनी वाढ होते.

    हेही वाचा - Pathaan: काय सांगता? शाहरुख खानने 'पठाण'साठी घेतलीये इतकी फी; दीपिका-जॉनपेक्षा पाचपट जास्त आहे आकडा

    हिंदुस्तान टाइम्सच्या वृत्तानुसार, कार्तिक आर्यन पहिल्या 12 महिन्यांसाठी 7.5 लाख, दुसऱ्या वर्षी 8.02 लाख आणि तिसऱ्या वर्षी 8.58 लाख रुपये मासिक भाडं देणार आहे. कार्तिकने यासाठी सिक्युरिटी डिपॉझिट म्हणून 45 लाख रुपये भरले आहेत. 36 महिन्यांच्या लीज व्यवहारासाठी मुद्रांक शुल्क आणि नोंदणी प्रक्रिया 12 जानेवारी 2023 रोजी पार पडली. zapkey.com ने मिळवलेल्या कागदपत्रांनुसार, शाहीदची पत्नी मीरा कपूर हिने त्याच्या वतीने, तर कार्तिक आर्यनची आई माला तिवारी यांनी त्याच्या वतीने हा व्यवहार केला आहे.

    वरळीतल्या नवीन घरात राहायला जाण्यापूर्वी शाहीद कपूर आणि मीरा यांनी अनेकदा त्यांच्या जुहूच्या घराच्या परिसरात काढलेले कौटुंबिक फोटो आणि व्हिडिओ शेअर केले आहेत. बसण्यासाठी प्रशस्त जागा हा या सेलेब्रिटी हाउसचा बहुधा सर्वांत जास्त पाहिला जाणारा झोन आहे. समुद्रकिनाऱ्याच्या जवळ असल्याने ही जाग अधिकच खास वाटते. हे क्षेत्र आधुनिक आणि नैसर्गिक गोष्टींचं मिश्रण आहे. समुद्रालगत असलेल्या हिरव्यागार लॉनमध्ये बसून सूर्यास्ताचा आनंद घेता येतो. आता याच घरात कार्तिक आर्यन राहायला येणार आहे.

    First published:

    Tags: Bollywood, Bollywood actor, Bollywood News