सारा अली खान नाही तर 'या' अभिनेत्रीला कार्तिक आर्यनची पहिली पसंती

सारा अली खान नाही तर 'या' अभिनेत्रीला कार्तिक आर्यनची पहिली पसंती

पतौडी प्रिन्सेस सारा अली खानलाही कार्तिक आवडतो हे तिने अनेकदा जाहीरपणे मान्य केलं आहे.

  • Share this:

मुंबई, 29 मे : कार्तिक आर्यन बॉलिवूडमधील त्या अभिनेत्यांपैकी आहे ज्यांच्या फिमेल फॅन फॉलोइंगची संख्या सर्वाधिक आहे. बॉलिवूडचा चॉकलेट हिरो म्हणून ओळखल्या जाणारा कार्तिक अनेक मुलींची क्रश आहे. एवढंच नाही तर पतौडी प्रिन्सेस सारा अली खानलाही कार्तिक आवडतो. तिने अनेकदा जाहीरपणे ही गोष्ट मान्य केली आहे. तर दुसरीकडे 'स्टूडंट ऑफ द इयर 2'मधून बॉलिवूड पदार्पण करणारी अभिनेत्री अनन्या पांडेचं नावही कार्तिकसोबत जोडलं जात आहे. पण एका मुलाखतीत कार्तिकनं आपल्या भावना व्यक्त केल्या आहेत.

कार्तिक आर्यननं काही दिवसांपूर्वीच नेहा धुपियाच्या चॅट शोमध्ये हजेरी लावली. यावेळी नेहानं कर्तिकला अनन्या पांडे आणि सारा अली खानपैकी एकीची निवड करण्यासाठी सांगितलं होतं यावर उत्तर देताना कार्तिकनं अनन्या पांडेचं नाव घेतलं. कार्तिक म्हणाला, 'सध्या तरी मी अनन्याला जास्त चांगलं ओळखतो आणि तिच्यासोबत कामही करत आहे.' शो दरम्यान कार्तिकला अनन्याची कोणती गोष्ट अजिबात आवडत नाही असं विचारण्यात आलं त्यावर, 'ती प्रत्येक गोष्टीवर प्रेम करते आणि प्रत्येक गोष्टीचं कौतुक करते.' असं उत्तर कार्तिकनं दिलं.

 

View this post on Instagram

 

☀️ #KartikxMufti

A post shared by KARTIK AARYAN (@kartikaaryan) on

काही दिवसांपूर्वी मुंबई मिररला दिलेल्या एका मुलाखतीत अनन्यानं कार्तिक आपली क्रश असल्याचं मान्य केलं होतं. ती म्हणाली, मी आता 20 वर्षांची आहे आणि या वयात मला एखादी व्यक्ती आवडणं खूप सामान्य गोष्ट आहे. मी माझ्या भावना मोकळेपणानं मांडते. मला कार्तिक क्यूट वाटतो आणि मी खूप नशीबवान आहे की मला त्याच्यासोबत काम करायला मिळत आहे.

 

View this post on Instagram

 

Park yourself in a theatre now, princess 😉👑🔫 Book your SOTY 2 tickets now!!!!! (Link in my bio)

A post shared by Ananya 👩🏻‍🎓💫 (@ananyapanday) on

कार्तिक आणि अनन्या लवकरच 'पति पत्नी और वो' या सिनेमात एकत्र झळकणार आहेत. य सिनेमाचं दिग्दर्शन मुसद्दर अजीज करत आहे. या सिनेमात कार्तिक आणि अनन्या व्यतिरिक्त भूमि पेडणेकरचीही महत्त्वाची भूमिका आहे.

VIRAL VIDEO : खासदार मिमी चक्रवर्ती आणि नुसरत जहाँचा बोल्ड डान्स

टीम इंडियाचा विजय मोठ्या पडद्यावर, '83' सिनेमाच्या निमित्तानं आदिनाथ कोठारेशी गप्पा

First published: May 29, 2019, 6:56 PM IST

ताज्या बातम्या

corona virus btn
corona virus btn
Loading