मराठी बातम्या /बातम्या /मनोरंजन /Dhamaka | कपिल शर्माच्या प्रश्नावर कार्तिक आर्यनची बोलती बंद! कार्तिक म्हणतो.. छुपाना भी नहीं आता, बताना भी नहीं आता'

Dhamaka | कपिल शर्माच्या प्रश्नावर कार्तिक आर्यनची बोलती बंद! कार्तिक म्हणतो.. छुपाना भी नहीं आता, बताना भी नहीं आता'

kartik Aaryan

kartik Aaryan

अभिनेता कार्तिक आर्यन (Kartik Aaryan) याचा धमाका (Dhamaka) चित्रपट ओटीटी प्लॅटफॉर्म नेटफ्लिक्सवर रिलीज झाला आहे. याचं प्रमोशन करण्यासाठी तो कपिल शर्माच्या (Kapil Sharma) शोमध्ये गेला होता. या कार्यक्रमात कपिलने त्याला प्रश्न विचारुन अडचणीत आललंय.

पुढे वाचा ...

मुंबई, 22 नोव्हेंबर: आपल्या चित्रपटांच्या प्रमोशनसाठी बॉलिवूडमधील जवळपास सगळे कलाकार कॉमेडियन कपिल शर्माच्या (Kapil Sharma) शोमध्ये सहभागी होतात. शोदरम्यान अनेकदा कपिल पाहुण्या कलाकारांना असे काही प्रश्न विचारतो की, त्यांची चांगलीच गोची होते. विचारलेल्या प्रश्नाला काय उत्तर द्यावे, हे त्यांना सुचत नाही. बॉलिवूड अभिनेता कार्तिक आर्यनला (Kartik Aaryan) नुकताच याचा अनुभव आला. सध्या सोशल मीडियावर कार्तिकचा एक व्हिडिओ व्हायरल होत आहे. ज्यामध्ये कपिल शर्मानं रिलेशनशीप स्टेटसबद्दल (Relationship status) प्रश्न विचारून कार्तिकला अडचणीत आणल्याचं दिसत आहे.

चार्मिंग पर्सनॅलिटी असलेला कार्तिक आर्यन अनेक तरुणींच्या गळ्यातील ताईत बनलेला आहे. आतापर्यंत त्याचं नाव अनेक अभिनेत्रींसोबत जोडलं गेलं आहे. मात्र, त्यानं स्वत: कधी आपल्या रिलेशनशीपबद्दल जाहीरपणे चर्चा केलेली नाही. 19 नोव्हेंबर 2021 रोजी कार्तिक आर्यनचा 'धमाका' नावाचा चित्रपट ओटीटी प्लॅटफॉर्म नेटफ्लिक्सवर रिलीज झाला आहे. या चित्रपटाला प्रेक्षकांचा चांगला प्रतिसाद मिळत आहे. या चित्रपटात कार्तिकनं न्यूज अँकरची भूमिका साकारली असून त्याच्यासोबत मृणाल ठाकूर आणि अमृता सुभाष यांनी काम केलं आहे. कार्तिकच्या अभिनयाला प्रेक्षकांनी दाद दिली आहे.

काही दिवसांपूर्वी कार्तिक आपल्या 'धमाका' (Dhamaka) या चित्रपटाच्या प्रमोशनसाठी सोनी इंटरटेनमेंट टीव्ही चॅनलवरील 'द कपिल शर्मा शो'मध्ये (The Kapil Sharma Show) आला होता. त्यावेळी कपिलनं कार्तिकचं गुपित उघड करण्याचा प्रयत्न केला. व्हायरल होत असलेल्या व्हिडिओच्या सुरुवातीला कपिल म्हणतो की, 'एखादी व्यक्ती रिलेशनशीपमध्ये नसते तेव्हा ती खूप रोमँटिक असते. जेव्हा ती कुणाच्या प्रेमात पडते तेव्हा अचानक आयुष्यात थ्रील निर्माण होतं. या निरीक्षणानुसार विचार केल्यास कार्तिकनं सुरुवातील अनेक रोमँटिक चित्रपट केले आणि तो धमाकासारख्या थ्रिलरपट घेऊन आला आहे. म्हणजेच कार्तिक प्रेमात पडला आहे, असा याचा अर्थ घ्यायचा का? कार्तिकचं रिलेशनशीप कन्फर्म झालं आहे की तो खासगी गोष्टी लपवण्याबाबत अधिक तयार झाला आहे? आपला चित्रपट हीट करण्यासाठी कार्तिक प्रेमात पडल्याचं दाखवतो का? असे प्रश्न कपिलनं कार्तिकला केले. कपिलच्या प्रश्नांना कार्तिकनं सरळ उत्तर न देता 'छुपाना भी नहीं आता, बताना भी नहीं आता', हे गाणं म्हटलं.

Panchgani मध्ये ड्रायव्हिंग करताना Kartik Aaryan ने घेतला चुकीचा टर्न; पोलिसांनी घेरलं आणि... पुढे काय घडलं पाहा VIDEO

कार्तिकचा गोंधळ उडालेला पाहून कपिलला आणखी चेव चढला. तो कार्तिकला आणखी गोंधळात टाकणारे प्रश्न विचारतो. 'तू कधी तुझ्या को-स्टार्सच्या प्रेमात पडत नाहीस का? केवळ चित्रपटाच्या प्रमोशनसाठी तू लोकांना चर्चेला कारण देतोस का?' असे प्रश्न कपिलनं कार्तिकला विचारले. हे प्रश्न ऐकून कार्तिक आर्यन हसला. मात्र, प्रश्नांची उत्तर देण्याचं टाळलं.

'लव्ह आज कल' चित्रपटाच्या शूटिंगदरम्यान कार्तिक आर्यन आणि त्याची को-स्टार सारा अली खान (Sara Ali Khan) यांच्या लिंकअपच्या बातम्या येत होत्या. ते अनेकदा सोबतही दिसले होते. मात्र, चित्रपट रिलीज झाल्यानंतर कार्तिक आर्यन आणि सारा वेगळे झाल्याच्या बातम्या माध्यमांमध्ये आल्या होत्या.

Kartik Aaryan ची 3.35 कोटींची नवीकोरी Lamborghini Urus देतेय हा त्रास, अभिनेत्याने स्वस्त: केला खुलासा

आता त्यानं अभिनेत्री मृणाल ठाकूरसोबत धमाका चित्रपटात काम केलं आहे. अद्याप तरी दोघांबाबत माध्यमांमध्ये चर्चा सुरू झालेली नाही, ही गोष्ट लक्षात घेऊनच कपिल शर्मानं आपल्या शोमध्ये कार्तिक आर्यनची फिरकी घेतली होती असं या व्हायरल व्हिडिओमधून दिसून येतंय.

First published:
top videos