• Home
  • »
  • News
  • »
  • entertainment
  • »
  • Panchgani मध्ये ड्रायव्हिंग करताना Kartik Aaryan ने घेतला चुकीचा टर्न; पोलिसांनी घेरलं आणि... पुढे काय घडलं पाहा VIDEO

Panchgani मध्ये ड्रायव्हिंग करताना Kartik Aaryan ने घेतला चुकीचा टर्न; पोलिसांनी घेरलं आणि... पुढे काय घडलं पाहा VIDEO

पाचगणीत फ्रेडीच्या शूटिंगला जायला निघालेला कार्तिक आर्यन रस्ता भरकटला.

  • Share this:
पाचगणी, 20 सप्टेंबर :  अभिनेता कार्तिक आर्यन (Kartik Aaryan) हा आपल्या आगामी फ्रेडी (Freddy) या चित्रपटाचं शूटिंग करतो आहे.या चित्रपटाचं शूटिंग पाचगणी (Panchgani) परिसरात सुरू आहे. आपल्या कारमधून शूटिंगला जायला निघाला कार्तिक पाचगणीत रस्ता भरकटला.  यावेळी तो स्वतः ड्रायव्हिंग करत होता (Kartik aaryan missed his way in panchgani). कार्तिक आर्यननने पाचगणीत चुकीचा टर्न घेतला. आपण रस्ता चुकलो आहोत हे त्याच्या लक्षात येताच त्याने गाडी थांबवली आणि मदत मागायला सुरुवात केली. इतक्यात तिथं काही पोलीस आले आणि त्यांनी कार्तिक आर्यनला घेरलं.  याचा व्हिडीओ सध्या सोशल मीडियावर व्हायरल झाला आहे.
हा व्हिडीओ रेकॉर्ड करणाऱ्या व्यक्तीनं कार्तिकला विचारलं की कुठे जायचं आहे? त्यावर कार्तिकनं विचारलं की मागील बाजूला उजवीकडं वळायला हवं होतं का? यावर ती व्यक्ती म्हणाली, अरे मित्रा तू पण ना. हे वाचा - कोर्टाने इशारा देताच पंगा गर्ल सुनावणीला हजर; अख्तर मानहानी प्रकरणी अडचणीत वाढ यानंतर पोलिसांना आपल्या मागे येताना पाहून कार्तिक म्हणाला, सर्व लोक माझ्या मागे का आलेत? त्यावर तू हरवशील म्हणून, असं उत्तर त्याला मिळालं.  यानंतर एका मागून एक पोलीस कर्मचारी कार्तिकसोबत सेल्फी घेत होते आणि सर तुम्हाला शूटिंगला उशीर तर होत नाही ना?, असं विचारत होते. यावर कार्तिक फक्त नाही असं उत्तर देत होता. अभिनेता कार्तिक आर्यन सध्या फ्रेडी या आगामी चित्रपटाच्या शूटिंगमध्ये व्यस्त आहे. 14 सप्टेंबरला फ्रेडी चित्रपटातील क्लायमॅक्स चित्रित झाला. या शूटिंगची छायाचित्रंही कार्तिकनं शेअर केली आहेत. फ्रेडी हा एक रोमँटिक थ्रिलर असून, यात कार्तिकसोबत अलाया एफ. प्रमुख भूमिकेत आहे. हे वाचा - या सुंदर तरुणीच्या प्रेमात पडलाय विवाहित रेमो डिसूझा; तुम्ही हिला ओळखलंत का? या व्यतिरिक्त ‘कार्तिक धमाका’, ‘शहजादा’ आणि ‘कॅप्टन इंडिया’ या आगामी चित्रपटातून झळकणार असून, `भूलभुलैय्या` या चित्रपटाचं देखील शूटिंग पूर्ण झालं आहे. काही दिवसांपूर्वी कार्तिक दीपिका पदुकोणसह दिग्दर्शक संजय लीला भन्साळी यांच्या ऑफिसमध्ये दिसला होता. या दोघांना मोठ्या पडद्यावर पाहण्यासाठी त्यांचे फॅन्स उत्सुक आहेत.
First published: