VIDEO : कार्तिक आर्यन बेधुंद होऊन वाजवत होता गिटार, अचानक आला कॉल आणि...

VIDEO : कार्तिक आर्यन बेधुंद होऊन वाजवत होता गिटार, अचानक आला कॉल आणि...

अभिनेता कार्तिक आर्यन तर या लॉकडाऊनमध्ये सोशल मीडियावर सर्वाधिक सक्रिय असलेला पाहायला मिळत आहे.

  • Share this:

मुंबई, 11 मे : कोरोना व्हायरसमुळे सध्या सर्व बॉलिवूड कलाकार आपापल्या घरी बसले आहे. अनेक सिनेमाचं शूटिंग लॉकडाऊनमुळे थांबवण्यात आलं आहे. त्यामुळे नेहमी बीझी राहणाऱ्या सेलिब्रेटींना आता बराच मोकळा वेळ मिळाला आहे. त्यामुळे सध्या सर्व सेलिब्रेटी सोशल मीडियावर त्यांचे व्हिडीओ फोटो शेअर करताना दिसत आहेत. अभिनेता कार्तिक आर्यन तर या लॉकडाऊनमध्ये सोशल मीडियावर सर्वाधिक सक्रिय असलेला पाहायला मिळत आहे. नुकताच त्यानं असा एक व्हिडीओ शेअर केला आहे जो पाहिल्यावर तुम्हाला हसू आवरणार नाही. त्याचा हा व्हिडीओ सध्या सोशल मीडियावर खूप व्हायरल होताना दिसत आहे.

कार्तिक आर्यन मागच्या काही दिवसांपासून सोशल मीडियावर खासकरून इन्स्टाग्रामवर खूप सक्रिय आहे. दर दिवशी त्याचा फोटो किंवा व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल होताना दिसत असतो. नुकताच त्यानं गिटार वाजवतानाचा एक व्हिडीओ सोशल मीडियावर शेअर केला आहे. ज्यामुळे हसू आवरणंही कठीण झालं आहे.

कसं आहे बेबो-साराचं नातं? करिना म्हणते; 'तिच्या सोडून जाण्यानं मला...'

आता तुम्ही म्हणाल यात हसण्यासारखं काय आहे. तर या व्हिडीओच्या सुरुवातीला कार्तिक अगदी बेधुंद होऊन गिटार वाजवताना दिसत आहे. दरम्यान त्याच्या बोटाला सुद्धा लागतं. पण जेव्हा तुम्ही हा व्हिडीओ शेवटपर्यंत बघाल तेव्हा तुम्हाला समजेल की कार्तिक तर फक्त गिटार वाजवण्याचा अभिनय करत होता. हा व्हिडीओ शेअर करताना कार्तिकनं दिलेलं कॅप्शन सुद्धा खूप मजेदार आहे.

 

View this post on Instagram

 

Haters gonna say i am not really playing it 🎸🔥 #KokiToki

A post shared by KARTIK AARYAN (@kartikaaryan) on

हा व्हिडीओ शेअर करताना लिहिलं, आता माझा तिरस्कार करणारे लोक सुद्धा म्हणतील की मी गिटार वाजवत नव्हतो. कार्तिकचा हा अंदाजचं चाहत्यांना हसायला भाग पाडतो. अशात त्याचं गिटार वाजवणंच नाही तर त्याचा लॉकडाऊन लूक सुद्धा सध्या सोशल मीडियावर चर्चेचा विषय ठरत आहे. त्याचा हा व्हिडीओ पाहिल्यावर सर्वजण त्याला कबीर सिंह असं म्हणताना दिसत आहेत. कारण त्यानं कबीर सिंह सारखी टोपी घातली आहे आणि दाढी सुद्धा वाढवली आहे.

सलमानसोबत काम करण्यास किंग खानचा नकार, शाहरुखनं सोडला बिग बजेट सिनेमा

कार्तिकच्या वर्कफ्रंटबद्दल बोलायचं तर कार्तिक आर्यन 'भूल भूलैय्या 2' आणि 'दोस्ताना 2' या दोन सिनेमांत दिसणार आहे. या सिनेमांची जोरदार चर्चा आहे. पण लॉकडाऊनमुळे सध्या सर्वच सिनेमांचं शूटिंग थांबलं आहे. देशात लॉकडाऊन करण्याआधी कार्तिक लखनऊमध्ये 'भूल भूलैय्या 2' चं शूटिंग करत होता. या सिनेमात त्याच्यासोबत कियारा अडवाणी स्क्रिन शेअर करणार आहे.

लॉकडाऊनमध्ये अभिनेत्री सापडली आर्थिक अडचणीत, घर चालवायलाही नाहीत पैसे

First published: May 11, 2020, 10:23 AM IST

ताज्या बातम्या

corona virus btn
corona virus btn
Loading