साराच्या फॅमिलीला इंप्रेस करण्यासाठी कार्तिक आर्यनची धडपड!

साराच्या फॅमिलीला इंप्रेस करण्यासाठी कार्तिक आर्यनची धडपड!

कार्तिक आणि सारा त्यांच्या नात्याला पुढे नेण्याविषयीचा विचार करत आहेत आणि कार्तिकनं याची तयारीही सुरू केल्याचं म्हटलं जात आहे.

  • Share this:

मुंबई, 31 जुलै : बी टाउनमध्ये सध्या एका नव्या कपलची चर्चा सुरु आहे. कार्तिक आर्यन आणि सारा अली खान सध्या वारंवार एकत्र दिसत असल्यानं त्यांच्या अफेअरच्या चर्चा आता सुरु आहेत. सारानं करण जोहरच्या चॅट शोमध्ये कार्तिकला डेट करायची इच्छा बोलून दाखवल्यानंतर अभिनेता रणवीर सिंहने एका इव्हेंटमध्ये या दोघांची भेट घडवून आणली होती. त्यानंतर या जोडीची लोकप्रियता लक्षात घेता इम्तियाज अली यांनी ‘लव्ह आज कल 2’साठी साइन केलं आणि यांच्यातील जवळीक वाढलेली दिसून आली. पण आता कार्तिक आणि सारा त्यांच्या नात्याला पुढे नेण्याविषयीचा विचार करत आहेत आणि कार्तिकनं याची तयारीही सुरू केल्याचं म्हटलं जात आहे.

सध्या कार्तिक आर्यन, भूमि पेडणेकर आणि अनन्या पांडे त्याचा आगामी सिनेमा ‘पति पत्नी और वो’च्या शूटिंगसाठी लखनऊमध्ये आहेत. मात्र साराला कार्तिकचा दुरावा सहन झाला नाही आणि ती सुद्धा कार्तिकला भेटायला लखनऊला पोहचली. यावेळी कार्तिक साराला गर्दीमध्ये प्रोटेक्ट करताना दिसला. प्रत्येक दिवशी या दोघांबद्दल काही ना काही नवीन ऐकायला मिळतंच. एकमेकांसोबत टाइम स्पेंड करण्यापासून ते एकमेकांसोबतचे फोटो सोशल मीडियावर शेअर करण्यापर्यंत सर्वच बाबतीत हे दोघंही चर्चेत असतात.

सर्वाधिक चर्चेत असणाऱ्या या बंगाली खासदाराच्या लग्नाची गोष्ट

 

View this post on Instagram

 

It's a WRAP!! 66 days & a million memories ❤️ Thank you @imtiazaliofficial for making my dream come true I truly appreciate your warmth, patience and consideration with me every single day. Being on your set has been a privilege that I will always cherish and already miss Thank you @kartikaaryan for instantly making me comfortable with you, for selflessly giving and for consistently looking out for me. From coffee’s about you to chai’s with you, I wish we could do it all over again ☕️ I’m going to miss you more than you know and more than I can admit ‍♀️ Imtiaz Ali’s next with @kartikaaryan and @randeephooda. ‬ ‪Releasing on 14th Feb 2020. Presented by @officialjiocinema , #DineshVijan’s @maddockfilms , @imtiazaliofficial & @reliance.entertainment @wearewsf

A post shared by Sara Ali Khan (@saraalikhan95) on

मीडिया रिपोर्टनुसार कार्तिकचं सारासोबतच तिच्या घरच्यांशीही खूप चांगलं बॉन्डिंग आहे. काही दिवसांपूर्वी साराचा भाऊ इब्राहिम खान आणि कार्तिक साराच्या रॅम्पवॉक डेब्यूच्या वेळी एकत्र दिसले. याशिवाय असंही म्हटलं जातं की, सारा आणि कार्तिक ज्यावेळी हिमाचल प्रदेशमध्ये ‘लव्ह आज कल 2’चं शूट करत होते त्यावेळी कार्तिक साराची आई अमृता सिंहसोबत बराच वेळ व्हिडिओ कॉलवर बोलत असे. जसं दररोज सारा आपल्या आईशी फोनवर बोलत असे त्या त्या प्रत्येक वेळी कार्तिक सुद्धा साराच्या आईशी बोलत असे.

प्रियकराच्या निधनातून सावरतेय संजय दत्तची मुलगी, म्हणाली...

 

View this post on Instagram

 

Eid Mubarak ✨

A post shared by Sara Ali Khan (@saraalikhan95) on

याशिवाय कार्तिक आणि साराचा भाऊ इब्राहिम यांच्यातही सुद्धा खूप चांगली मैत्री असल्याचं पाहायला मिळालं. सारानं नुकताच रॅम्पवॉक डेब्यू केला त्यावेळी कार्तिक आणि इब्राहिम तिला एकत्र चिअरअप करताना दिसले. त्यामुळे कार्तिक साराच्या फॅमिलीला इंप्रेस करण्यासाठी धडपड करत असल्याचं दिसत असून हे दोघंही त्यांच्या नात्याबाबात गंभीर असल्याचं बोललं जात आहे.

'या' टीव्ही अभिनेत्रीचा TOPLESS YOGA फोटो व्हायरल, कॅप्शनमध्ये लिहिलं...

 

View this post on Instagram

 

I smile because you’re my brother ...I laugh because there’s nothing you can do about it ‍♀️‍‍

A post shared by Sara Ali Khan (@saraalikhan95) on

वर्कफ्रंटबाबत बोलायचं तर कार्तिक आणि सारा इम्तियाज अली यांच्या ‘लव्ह आज कल 2’ मध्ये दिसणार आहेत. हा सिनेमा 2009 मध्ये सैफ अली खान आणि दीपिका पदुकोणच्या ‘लव्ह आज कल’चा सिक्वेल आहे. 2020 मध्ये व्हॅलेंटाइन डेच्या मुहूर्तावर सारा आणि कार्तिकचा हा सिनेमा प्रेक्षकांच्या भेटीला येत आहे.

==================================================================

VIDEO : बच्चेकंपनी ती बच्चेकंपनी, निघाली नादखुळा एक्स्प्रेस!

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला आणि टि्वटरवर फाॅलो करा

First Published: Jul 31, 2019 10:27 AM IST

ताज्या बातम्या