साराला उचलून घेत कार्तिक आर्यननं केला धम्माल डान्स, पाहा VIDEO

साराला उचलून घेत कार्तिक आर्यननं केला धम्माल डान्स, पाहा VIDEO

'लव्ह आजकल'च्याप्रमोशनमधील एक व्हिडीओ समोर आला आहे. ज्यात कार्तिक आर्यन साराला उचलून घेत डान्स करताना दिसत आहे.

  • Share this:

मुंबई, 06 फेब्रुवारी : सारा अली खान आणि कार्तिक आर्यन हे सध्या बी टाऊनमधलं सर्वाधिक चर्चेत असणारं कपल आहे. या दोघांची ऑनस्क्रीन केमिस्ट्री तर आपल्याला येत्या 14 फेब्रुवारीला ‘लव्ह आजकल’मध्ये पाहायला मिळाणारच आहे. पण हे दोघं सिनेमाच्या रिलीज अगोदर त्यांच्या ऑफस्क्रीन केमिस्ट्रीमुळे चर्चेत आहेत. सध्या हे दोघं त्यांच्या सिनेमाचं जोरदार प्रमोशन करत आहे. याच प्रमोशनमधील एक व्हिडीओ समोर आला आहे. ज्यात कार्तिक आर्यन साराला उचलून घेत डान्स करताना दिसत आहे.

कार्तिक आर्यननं नुकताच त्याच्या सोशल मीडिया अकाउंटवर एक व्हिडीओ शेअर केला आहे. ज्यात कार्तिक आणि सारा हां मै गलत या गाण्यावर डान्स करताना दिसत आहेत. पण डान्स करता करता अचानक साराला उचलून घेतो. ज्यामुळे स्वतः सारा सुद्धा हैराण होते. त्यांचा हा व्हिडीओ सध्या सोशल मीडियावर खूप व्हायरल होताना दिसत आहे.

रानू मंडल यांचं हिमेश रेशमियासोबत नवं गाणं रिलीज, पाहा VIDEO

View this post on Instagram

#SarTik in #Ahmedabad ❤️ kem Cho #LoveAajKal 🔥❤️🎷 #14thFeb

A post shared by KARTIK AARYAN (@kartikaaryan) on

कार्तिक-साराची ही क्यूट केमिस्ट्री प्रेक्षकांच्या पसंतीस उतरत आहे. सोशल मीडियावर व्हायरल झालेल्या या व्हिडीओमध्ये सारा ट्रेडिशनल लुकमध्ये दिसत आहे. तर कार्तिकनं व्हाइट शर्टवर ऑरेंज कलरचं जॅकेट घातलं आहे. हा व्हिडीओ शेअर करताना कार्तिकनं लिहिलं, ‘अहमदाबादमध्ये सार्तिक, केम छो’

किशोर कुमार यांच्या सिनेमावर कोर्टानं घातली होती बंदी, 60 वर्षांनी सापडली रिल्स

View this post on Instagram

I promise you My expression is becoz of the food !

A post shared by KARTIK AARYAN (@kartikaaryan) on

‘लव्ह आज कल’चं दिग्दर्शन इम्तियाज अली यांनी केलं असून सिनेमात बी टाऊनमधील सर्वाधिक लोकप्रिय जोडी सारा-कार्तिक पहिल्यांदाच मोठ्या पडद्यावर रोमान्स करताना दिसणार आहे. त्यांचा हा सिनेमा येत्या 14 फेब्रुवारीला प्रेक्षकांच्या भेटीला येत आहे. याशिवाय सारा वरुण धवनसोबत ‘कुली नंबर 1’च्या रिमेकमध्ये सुद्धा दिसणार आहे. तसेच दिग्दर्शक रोहित शेट्टीनं सारा-कार्तिकच्या जोडीला चेन्नई एक्स्प्रेसच्या सिक्वेलसाठी साइन करण्याची इच्छा बोलून दाखवली. असं झाल्यास सारा-कार्तिकची जोडी पुन्हा एकदा एकत्र दिसेल.

साऊथ सुपरस्टार विजयच्या घरावर आयकर विभागाची कारवाई, 65 कोटींची रोकड जप्त

First published: February 6, 2020, 4:12 PM IST

ताज्या बातम्या