Home /News /entertainment /

कार्तिक आर्यननं आईसोबतचा फोटो पोस्ट करण्याचे मागितले पैसे, तिनंही दिलं सडेतोड उत्तर

कार्तिक आर्यननं आईसोबतचा फोटो पोस्ट करण्याचे मागितले पैसे, तिनंही दिलं सडेतोड उत्तर

कार्तिकनं त्याच्या आईसोबत फोटो शेअर करण्याचे पैसे मागितले. ज्याचा व्हिडीओ सध्या सोशल मीडियावर व्हायरल होताना दिसत आहे.

  मुंबई, 12 मे : अभिनेता कार्तिक आर्यन लॉकडाऊनच्या काळात सोशल मीडियावर बराच सक्रिय आहे. दरम्यान तो सध्या त्याच्या कुटुंबासोबत टाइम स्पेंड करताना दिसत आहे. याआधीच त्यानं त्याच्या बहिणीसोबत अनेक व्हिडीओ शेअर केले आहे. नुकत्याच झालेल्या मदर्स डेला सर्व सेलिब्रेटींनी त्यांच्या आईसोबत फोटो शेअर केले. मात्र कार्तिकनं त्याच्या आईसोबत फोटो शेअर केलेला नाही. याउलट त्यानं फोटो पोस्ट करण्याचे पैसे आईकडेच मागितले. ज्याचा व्हिडीओ सध्या सोशल मीडियावर व्हायरल होताना दिसत आहे. सोशल मीडियावर व्हायरल झालेल्या या व्हिडीओमध्ये कार्तिकची आई त्याला तिच्यासोबतचा एक फोटो सोशल मीडियावर पोस्ट करायला सांगते. त्यावर तो आईला सांगतो, मम्मी तुला माहित आहे का मला एका सोशल मीडिया पोस्टचे किती पैसे मिळतात. एक फोटो पोस्ट करण्यासाठी लोक मला लाखो रुपये देतात. तू देणार का? यावर कार्तिकची आई त्याला म्हणते फोटो पोस्ट कर नाहीतर एक लाथ देईन. ज्यावर कार्तिकची बोलती बंद होते. इरफानच्या या कँडिड PHOTO मुळे चाहते भावूक, मुलगा बाबीलने शेअर केली आठवण
  View this post on Instagram

  Maa ki Mamta ❤️

  A post shared by KARTIK AARYAN (@kartikaaryan) on

  हा व्हिडीओ कार्तिकनं स्वतःच त्याच्या सोशल मीडियावर पोस्ट केला आहे. या फोटोच्या कॅप्शनमध्ये त्यानं लिहिलं. 'माँ की ममता' अर्थात आईचं प्रेम हे असं असतं. याआधीही कार्तिकचा गिटार वाजवतानाचा व्हिडीओे व्हायरल झाला होता. ज्यातील कार्तिक आर्यनच्या कबीर सिंह लुकची बरीच चर्चा झाली. कार्तिकच्या वर्कफ्रंटबद्दल बोलायचं तर कार्तिक आर्यन 'भूल भूलैय्या 2' आणि 'दोस्ताना 2' या दोन सिनेमांत दिसणार आहे. या सिनेमांची जोरदार चर्चा आहे. पण लॉकडाऊनमुळे सध्या सर्वच सिनेमांचं शूटिंग थांबलं आहे. देशात लॉकडाऊन करण्याआधी कार्तिक लखनऊमध्ये 'भूल भूलैय्या 2' चं शूटिंग करत होता. या सिनेमात त्याच्यासोबत कियारा अडवाणी स्क्रिन शेअर करणार आहे. शाहरुखची ऑनस्क्रीन मुलगी BOLDNESS च्या बाबतीत देतेय बॉलिवूड अभिनेत्रींना टक्कर शिल्पा शेट्टीनं या आजारमुळे घेतली सरोगसीची मदत, अनेकदा झाला होता गर्भपात
  Published by:Megha Jethe
  First published:

  Tags: Bollywood, Kartik aryan

  पुढील बातम्या