VIDEO इम्तियाज अलीच्या पार्टीत कार्तिक आर्यनचा धम्माल डान्स, सारा मात्र गायब

काही दिवसांपूर्वीच या आगामी सिनेमातील कार्तिक-साराचा फर्स्ट लुक शेअर करण्यात आला. यात या दोघांची जबरदस्त केमिस्ट्री पाहायला मिळत आहे.

News18 Lokmat | Updated On: Apr 3, 2019 05:21 PM IST

VIDEO इम्तियाज अलीच्या पार्टीत कार्तिक आर्यनचा धम्माल डान्स, सारा मात्र गायब

मुंबई, 03 मार्च : अभिनेत्री सारा अली खान आणि कार्तिक आर्यन याची सध्या बॉलिवूडमध्ये जोरदार चर्चा सुरू आहे. 'कॉफी विथ करण' या चॅट शोमध्ये सारानं कार्तिक आर्यनला डेट करण्याची इच्छा बोलून दाखवल्यापासून हे दोघंही कोणत्या ना कोणत्या कारणाने चर्चेत आहेत. त्यानंतर दिग्दर्शक इम्तियाज अली यांनी या दोघांची प्रसिद्धी लक्षात घेत आपल्या आगामी सिनेमासाठी कास्ट केलं. या सिनेमाचं नाव अद्याप स्पष्ट झालेलं नसलं तरी 2009 मधील सैफ अली आणि दीपिका पदुकोणचा सुपरहिट सिनेमा 'लव्ह आज कल'चा सिक्वेल असल्याचं म्हटलं जात आहे. या सिनेमाचं दिल्लीत शूटिंग संपल्यावर इम्तियाज अलींनी एका पार्टीचं आयोजन केलं होतं पण या पार्टीत सारा अली खान मात्र उपस्थित नव्हती.
काही दिवसांपूर्वीच या सिनेमातील कार्तिक-साराचा फर्स्ट लूक शेअर करण्यात आला. यात या दोघांची जबरदस्त केमिस्ट्री पाहायला मिळात आहे. नुकताच कार्तिकनं त्याच्या इन्स्टाग्रामवर एक व्हिडीओ शेअर केला ज्यात तो दिग्दर्शक इम्तियाज अली यांच्या सोबत लव्ह आजकल मधील सुपरहिट गाणं 'आहू आहू' धम्माल डान्स करताना दिसत आहे. हा व्हिडीओ दिल्लीतील शूटिंगनंतर दिलेल्या पार्टीतील असल्याचं म्हटलं जात आहे. मात्र या पार्टीत सारा आली खान दिसत नसल्यानं अनेकांच्या भुवया उंचावल्या आहेत. कारण सिनेमातील सर्व कलाकार या पार्टीत एकत्र एंजॉय करत असताना मात्र सारा या पार्टीतून गायब आहे.
काही दिवसांपूर्वीच सारानं दिल्लीतील शूटिंग संपल्यावर तिच्या सोशल मीडियावर एक व्हिडीओ शेअर केला होता. यावेळी ती कार्तिकसोबत चाहत्यांचे आभार मानताना दिसली होती. त्यानंतर सारा तिच्या इतर महत्त्वाच्या कामांमुळे लगेचच मुंबईला परतली. त्यामुळे इम्तियाज अलींच्या या पार्टीत ती उपस्थित राहू शकली नसल्याचं सुत्रांचं म्हणणं आहे. सारा आणि कार्तिकला एकत्र पाहण्याची त्यांच्या चाहत्यांची इच्छा इम्तियाज अलींच्या या सिनेमामुळे पूर्ण होणार असून हा सिनेमा 2020 मध्ये रिलीज होईल असं म्हटलं जात आहे.
 

View this post on Instagram
 

And that’s a schedule wrap for me in Delhi ‍♀️⏯‼️


A post shared by Sara Ali Khan (@saraalikhan95) on
बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला , टि्वटरवर आणि जी प्लस फाॅलो करा

First Published: Apr 3, 2019 05:21 PM IST
Loading...

ताज्या बातम्या

Loading...

Live TV

News18 Lokmat
close