‘असा अभिनय यापूर्वी पाहिला नाही’; कार्तिक आर्यनचा धमाका पाहून अमृता झाली स्तब्ध

अगदी मराठी अभिनेत्री अमृता सुभाषदेखील (Amruta Subhash) त्याचा अभिनय पाहून थक्क झाली आहे. तिला कार्तिकसोबत काम केल्याचा गर्व वाटतो असं ती म्हणाली.

अगदी मराठी अभिनेत्री अमृता सुभाषदेखील (Amruta Subhash) त्याचा अभिनय पाहून थक्क झाली आहे. तिला कार्तिकसोबत काम केल्याचा गर्व वाटतो असं ती म्हणाली.

  • Share this:
    मुंबई 3 एप्रिल: कार्तिक आर्यन (Kartik Aaryan) हा बॉलिवूडमधील एक लोकप्रिय अभिनेता म्हणून ओळखला जातो. कार्तिकचा धमाका (Dhamaka) हा चित्रपट लवकरच प्रेक्षकांच्या भेटीस येत आहे. या चित्रपटात कार्तिक एका पत्रकाराच्या भूमिकेत झळकणार आहे. अलिकेडेच या चित्रपटाचा टीझर प्रदर्शित झाला. अन् हा व्हिडीओ पाहून सर्वत्र कार्तिकच्या अभिनयाची स्तुती होत आहे. अगदी मराठी अभिनेत्री अमृता सुभाषदेखील (Amruta Subhash) त्याचा अभिनय पाहून थक्क झाली आहे. तिला कार्तिकसोबत काम केल्याचा गर्व वाटतो असं ती म्हणाली. धमाका या चित्रपटात अमृता देखील एक महत्वाची भूमिका साकारणार आहे. अलिकडेच या चित्रपटाच्या निमित्तानं दिलेल्या एका मुलाखतीत तिनं कार्तिकवर कौतुकाचा वर्षाव केला. ती म्हणाली, “तो एक महत्वाकांक्षी अभिनेता आहे. त्याची मेहनत पाहून अवाक् व्हायला होतं. जो पर्यंत दिग्दर्शकाला हवा तसा टेक मिळत नाही तोपर्यंत न कंटाळता तो काम करतो. धमाकाचा टीझर पाहून मी देखील आश्चर्यचकित झाले. कार्तिकसोबत काम केल्याचा मला गर्व आहे. त्याला मिळणारं स्टारडम पाहून मला खूप आनंद होतोय.” अवश्य पाहा - लता मंगेशकरांच्या सल्ल्याकडे केलं होतं दुर्लक्ष; त्या चूकीसाठी हरिहरन आजही मागतायेत माफी 22 नोव्हेंबर 2020 रोजी कार्तिकच्या वाढदिवसानिमित्त ‘धमाका’ या चित्रपटाची घोषणा सोशल मीडियाच्या माध्यमातून केली होती. या चित्रपटात कार्तिकसोबत अभिनेत्री मृणाल ठाकूर, अमृता सुभाष, अभिनेता विकास कुमार आणि विश्वजित मुख्य भूमिकेत दिसणार आहेत. या चित्रपटाचे दिग्दर्शन राम माधवानी यांनी केले आहे. ‘धमाका’ नेटफ्लिक्सवर 190 देशांत प्रदर्शित होणार आहे.
    Published by:Mandar Gurav
    First published: