मराठी बातम्या /बातम्या /मनोरंजन /

जान्हवी कपूर सोबत भांडण कार्तिक आर्यनला पडलं महागात; 'दोस्ताना 2' नंतर आणखी एका चित्रपटातून झाला OUT

जान्हवी कपूर सोबत भांडण कार्तिक आर्यनला पडलं महागात; 'दोस्ताना 2' नंतर आणखी एका चित्रपटातून झाला OUT

 'मिस्टर अँड मिसेस माही'मध्ये करण जोहरला सर्वप्रथम कार्तिक आर्यन   (Kartik Aryan)  आणि जान्हवी कपूरला एकत्र घ्यायचे होते. परंतु, करण जोहरच्या 'दोस्ताना 2'सोबत हा चित्रपटही कार्तिक आर्यनच्या हातून निसटला आहे.

  • Published by:  Aiman Desai

मुंबई, 24 नोव्हेंबर-  राजकुमार राव   (Rajkumar Rao)  आणि जान्हवी कपूर   (Janhavi Kapoor)  पुन्हा एकदा 'मिस्टर अँड मिसेस माही'   (Mr and Mrs Mahi)   मध्ये एकत्र स्क्रीन शेअर करताना दिसणार आहेत. करण जोहरने २२ नोव्हेंबरला या चित्रपटाची घोषणा केली आहे. या चित्रपटात राजकुमार राव आणि जान्हवी कपूर धमाल करताना दिसणार आहेत. याआधी ही जोडी 'रुही' चित्रपटात दिसली होती. ज्याला लोकांचे भरभरून प्रेम मिळाले होते. आता पुन्हा एकदा ही जोडी रुपेरी पडद्यावर दिसणार आहे.

कार्तिक आर्यन होता पहिली पसंत-

आम्ही तुम्हाला सांगू इच्छितो की, 'मिस्टर अँड मिसेस माही'मध्ये करण जोहरला सर्वप्रथम कार्तिक आर्यन   (Kartik Aryan)  आणि जान्हवी कपूरला एकत्र घ्यायचे होते. परंतु, करण जोहरच्या 'दोस्ताना 2'सोबत हा चित्रपटही कार्तिक आर्यनच्या हातून निसटला आहे. मीडिया रिपोर्ट्सनुसार, यावर्षी कार्तिक आर्यन आणि जान्हवी कपूरमध्ये मतभेद झाले होते. दोघांनी इंस्टाग्रामवर एकमेकांना अनफॉलो केले होते. यानंतर जान्हवीने कार्तिक आर्यनशी सर्व संपर्कदेखील तोडले आहेत.

तारखांबाबत सुरु होती टाळाटाळ-

ई-टाइम्सच्या वृत्तानुसार, कार्तिक आर्यन तारखांमध्ये उशीर करत होता. यामुळे निर्मात्यांना चित्रपटाचे शूटिंग सतत पुढे ढकलावे लागत होते. अखेर कार्तिक आर्यनच्या वागणुकीनंतर करण जोहरने त्याला चित्रपटातून बाहेर केले आणि चित्रपटात राजकुमार रावची वर्णी लागली. त्याचवेळी 'दोस्ताना 2' बद्दल बोलायचे झाले तर, या चित्रपटाचे 60 टक्के शूटिंगही झाले होते. आणि त्यासाठी मोठी रक्कमदेखील खर्च करण्यात आली होती.

(हे वाचा:निक नव्हे तर दिरामुळे प्रियांकानं हटवलं जोनस आडनाव; वाचा काय आहे नेमकं प्रकरण )

2022 मध्ये होणार रिलीज-

'मिस्टर अँड मिसेस माही' हा स्पोर्ट्स ड्रामा चित्रपट आहे. शरण शर्मा या चित्रपटाचे दिग्दर्शन करत आहेत. शरण शर्माने 'गुंजन सक्सेना: द कारगिल गर्ल'चे दिग्दर्शनही केले होते. यामध्येसुद्धा अभिनेत्री जान्हवी कपूरच होती. राजकुमार राव आणि जान्हवीचा हा चित्रपट 7 ऑक्टोबर 2022 रोजी प्रदर्शित होणार आहे.

(हे वाचा:प्रियांका चोप्रा आहे प्रेग्नेंट? घटस्फोटाच्या चर्चेदरम्यान अभिनेत्रीचं वक्तव्य )

कार्तिक आर्यनने केला 'धमाका'

कार्तिक आर्यनबद्दल सांगायचे झाले तर, नुकताच त्याचा 'धमाका' नेटफ्लिक्सवर रिलीज झाला आहे ज्यामध्ये तो अँकर आणि पत्रकाराची भूमिका साकारताना दिसत आहे. या चित्रपटाचे खूप कौतुक होत आहे आणि लोकांना हा चित्रपट खूप आवडला आहे. याशिवाय कार्तिक आर्यन 'फ्रेडी', 'भूल भुलैया 2', 'शहजादा' आणि 'कॅप्टन इंडिया'मध्ये दिसणार आहे.

First published:

Tags: Entertainment, Janhavi kapoor, Kartik aryan