आत्महत्येच्या धमक्यांनंतर कर्नाटकमध्ये सनी लिआॅनच्या 'न्यू इअर' कार्यक्रमावर बंदी

"सनी लिआॅनला कार्यक्रमासाठी राज्यात बोलवणे म्हणजेच संस्कृतीवर हल्ला झाल्यासारखंच आहे असे आरोपही झालेत"

Sachin Salve | News18 Lokmat | Updated On: Dec 16, 2017 08:14 PM IST

आत्महत्येच्या धमक्यांनंतर कर्नाटकमध्ये सनी लिआॅनच्या 'न्यू इअर' कार्यक्रमावर बंदी

16 डिसेंबर : बंगळुरु येथे अभिनेत्री सनी लिआॅनच्या कार्यक्रमावरुन निर्माण झालेला वाद आता चिघळलाय. कन्नड संघटनांननी केलेल्या विरोधानंतर आता चक्क कर्नाटक सरकारनेच सनीच्या या न्यू इअरच्या कार्यक्रमावर बंदी घातली आहे. नविन वर्षाच्यानिमित्ताने राज्यात कुठेही कार्यक्रम होणार नसल्याचं कर्नाटक सरकारने स्पष्ट केलंय.

कर्नाटकमध्ये अनेक संघंटनांनी 31 डिसेंबर रोजी होणाऱ्या सनीच्या या कार्यक्रमाला तीव्र विरोध केला. एवढंच नव्हे तर काही भागात मोर्चे काढून सनीच्या पुतळ्याचे दहनही करण्यात आले. सनी लिआॅनला कार्यक्रमासाठी राज्यात बोलवणे म्हणजेच संस्कृतीवर हल्ला झाल्यासारखंच आहे असे आरोपही करण्यात आलेत. सनीने जर बंगळुरुमध्ये कार्यक्रम केला आम्ही मोठ्या संख्येने आत्महत्या करु अशीही धमकी देण्यात आली. गेल्या बऱ्याच दिवसांपासून कार्यक्रमाला होणारा हा विरोध पाहून राज्य-सरकारने हा महत्त्वपूर्ण निर्णय घेतलाय.

सनीच्या या नवीन वर्षाच्या या कार्यक्रमाला परवानगी दिली जाऊ नये असं माझं ठाम मत आहे. तसंच याआधीही कोणतीही अभिनेत्री कार्यक्रमासाठी राज्यात आली असता कायदा-सुव्यवस्थेची समस्या निर्माण झाली असल्याचं कर्नाटकचे गृहमंत्री रामलिंग रेड्डी यांनी म्हटलंय.

राज्यसरकारने सनीच्या या कार्यक्रमाबाबत घेतलेल्या निर्णयाचं अनेकांनी स्वागतही केलंय.

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला आणि टि्वटरवर फाॅलो करा

First Published: Dec 16, 2017 08:13 PM IST
Loading...

ताज्या बातम्या

Loading...