अभिनेत्री कंगना रणौतविरोधात दाखल होणार FIR; एका TWEET मुळे अडचणीत

अभिनेत्री कंगना रणौतविरोधात दाखल होणार FIR; एका TWEET मुळे अडचणीत

एका प्रकरणाबाबत सोशल मीडियावर आपलं मत मांडणं कंगना रणौतला (kangana ranaut) चांगलंच महागात पडणार आहे.

  • Share this:

मुंबई, 09 ऑक्टोबर : बॉलिवूड अभिनेत्री कंगना रणौत (Kangana Ranaut) सध्या कोणत्या ना कोणत्या कारणांमुळे चर्चेत आहे. फक्त बॉलिवूडच नव्हे तर देशात यादरम्यान घडलेल्या प्रत्येक घटनेवर तिनं आपली प्रतिक्रिया दिली आहे. सोशल मीडियावर (Social Media) ती आपली भूमिका मांडत आली आहे. अशाच एका प्रकरणाबाबत सोशल मीडियावर आपलं मत मांडणं तिला चांगलंच महागात पडणार आहे.

कंगनाने केलेल्या एका ट्वीटमुळे ती अडचणीत सापडली आहे.

कंगनाच्या एका ट्वीटवरून कर्नाटकातील न्यायालयाने तिच्याविरोधात FIR दाखल करण्याचे आदेश दिले आहेत. कंगनाने हे ट्वीट शेतकऱ्यांबाबत केलं होतं. जे तिनं नंतर डिलीट केलं. या ट्वीटमध्ये कंगनाने शेतकऱ्यांचा अपमान केला असा आरोप करण्यात आला आहे.

एनएनआयने दिलेल्या वृत्तानुसार, कर्नाटकातील कोर्टाने कंगनाविरोधात FIR दाखल करण्याचे आदेश दिले आहेत.  नुकत्याच मंजूर झालेल्या कृषी कायद्यावरून शेतकऱ्यांनी आंदोलन केलं होतं. त्याबाबत कंगनाने ट्वीट केलं होतं. हे ट्वीट कंगनाने आता डिलीट केलं आहे.

मीडिया रिपोर्ट्सनुसार क्यशसांद्रा पोलीस ठाण्यात एफआयर दाखर करण्याचे निर्देश कोर्टाने दिले आहेत. दरम्यान या संपूर्ण प्रकरणाबबत कंगनाने अद्याप प्रतिक्रिया दिली नाही आहे.

Published by: Priya Lad
First published: October 9, 2020, 9:38 PM IST

ताज्या बातम्या