करिश्मा कपूर पुन्हा अडकणार लग्नाच्या बेडीत

करिश्मा कपूर पुन्हा अडकणार लग्नाच्या बेडीत

करिश्मा कपूरच्या घरी लवकरच सनई चौघडे वाजणार आहेत. करिश्मा कपूरचा 2013साली संजय कपूर सोबत घटस्फोट झाला. त्यानंतर तिच्या आणि संदीप तोष्णीवाल यांच्या प्रेमाच्या चर्चा चांगल्याच रंगल्या.

  • Share this:

07 नोव्हेंबर : करिश्मा कपूरच्या घरी लवकरच सनई चौघडे वाजणार आहेत.  करिश्मा कपूरचा 2013साली संजय कपूर सोबत घटस्फोट झाला. त्यानंतर तिच्या आणि संदीप तोष्णीवाल यांच्या प्रेमाच्या चर्चा चांगल्याच रंगल्या. संदीप तोष्णीवाल हा मुंबईतल्या फार्मा कंपनीचा मालक आहे. संदीप आधीच विवाहित असून त्याला दोन मुली आहेत.

गेले 7 वर्ष करिश्मासोबतच्या नात्यामुळे संदीप आपली डाॅक्टर पत्नी अर्शिताशी घटस्फोट घेण्याच्या प्रक्रियेत होता. अखेर त्याची घटस्फोट झाला. म्हणजेच काय तर आता कपूर घराण्यात लवकरच लग्नाचा बँड वाजणार असं दिसतंय.

सोमवारी वांद्रे कौटुंबिक न्यायालयामध्ये त्यांचा घटस्फोट झाला. सूत्रांच्या माहितीनुसार 2010मध्ये संदीप तोष्णीवालने घटस्फोटासाठी अर्ज केला होता. गेली सात वर्ष त्यांच्यात घटस्फोटाचा वाद सुरु होता.

या घटस्फोटाच्या करारानुसार संदीप तोष्णीवालने त्याच्या मुलींच्या पालन-पोषणासाठी प्रत्येकी 3 कोटी देणार असल्याचं आणि त्यांच्या पत्नीला 2 कोटी देणार असल्याचं सांगितलं जात आहे. त्याचबरोबर संदीपचं दिल्लीत असणारं घरही त्याच्या बायकोच्या ताब्यात असणार आहे. तोष्णीवालच्या दोन्ही मुली त्यांच्या आईकडेच राहणार आहेत.

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला आणि टि्वटरवर फाॅलो करा

First Published: Nov 7, 2017 01:25 PM IST

ताज्या बातम्या

corona virus btn
corona virus btn
Loading