करिष्मा तुही यत्ता कंची?

बॉलिवूड अभिनेत्री करिष्मा कपूर ही जेमतेम पाचवीपर्यंतच शिकलीय. ही बाब नुकतीच उघड झालीय. खरं तर करिष्माने आजवर केलेल्या भूमिका आणि कोणत्याही ठिकाणी तिचा असलेला वावर पाहता तिचं शिक्षण एवढं कमी झालंय असं कुणाला सांगूनही खरं वाटणार नाही.

Sonali Deshpande | News18 Lokmat | Updated On: Apr 17, 2018 01:08 PM IST

करिष्मा तुही यत्ता कंची?

17 एप्रिल : बॉलिवूड अभिनेत्री करिष्मा कपूर ही जेमतेम पाचवीपर्यंतच शिकलीय. ही बाब नुकतीच उघड झालीय. खरं तर करिष्माने आजवर केलेल्या भूमिका आणि कोणत्याही ठिकाणी तिचा असलेला वावर पाहता तिचं शिक्षण एवढं कमी झालंय असं कुणाला सांगूनही खरं वाटणार नाही. मात्र हे खरं आहे.

करिष्माला लहानपणापासूनच बॉलिवूडमध्ये अभिनेत्री म्हणून करिअर करायचं होतं. त्यामुळे तिने शिक्षणाकडे फारसं लक्ष न देता अभिनयाकडेच लक्ष केंद्रित केलं. त्यात ती यशस्वीही झाली. मग राजा हिंदुस्थानी असो नाही तर झुबैदा.. प्रत्येक भूमिकेत करिष्मानं जीव ओतलाय. लग्न करून ती या सिनेसृष्टीच्या बाहेरच पडलेली. त्यामुळे बाॅलिवूडनं चांगल्या अभिनेत्रीला मिस केलं.

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला आणि टि्वटरवर फाॅलो करा

First Published: Apr 17, 2018 01:08 PM IST
Loading...

ताज्या बातम्या

Loading...