• Home
  • »
  • News
  • »
  • entertainment
  • »
  • एकता कपूर करतेय बाॅलिवूडच्या 'या' लोकप्रिय अभिनेत्रीचा कमबॅक

एकता कपूर करतेय बाॅलिवूडच्या 'या' लोकप्रिय अभिनेत्रीचा कमबॅक

बाॅलिवूडची एक गुणी अभिनेत्री असं तिला म्हणता येईल. तिनं एक काळ गाजवला.

  • Share this:
मुंबई, १० आॅगस्ट : बाॅलिवूडची एक गुणी अभिनेत्री असं तिला म्हणता येईल. तिनं एक काळ गाजवला. वेगवेगळ्या शेड्सच्या भूमिका केल्या. मग राजा हिंदुस्थानी असो, झुबैदा असो, कुली नंबर १ असो, ती प्रत्येक भूमिका समरसून जगली. हिट झाली. बरोबर ओळखलत, आपण करिष्मा कपूरबद्दलच बोलतोय. अभिषेक बच्चनसोबत तिचा साखरपुडाही झाला. मग तो मोडला. तिनं दिल्लीतल्या व्यावसायिकाशी लग्न केलं. आई झाली. मग घटस्फोटही झाला. अशा बऱ्याच घडामोडी घडल्यानंतर आता  करिष्मा पुन्हा कमबॅक करतेय. एकता कपूरच्या वेब सीरिजमध्ये तिची भूमिका आहे. डीएनएच्या बातमीनुसार एकता कपूर एक वेबसीरिज घेऊन येतेय. त्यात मुख्य भूमिकेत करिष्मा असेल. करिष्मा मागे एका मुलाखतीत म्हणाली होती, 'सध्या अभिनय करायचा विचार नाही. एखादी गोष्ट आवडली तर विचार करू.' आणि आता ती कमबॅक करतेय. योगायोग पहा, करिनाचाही कमबॅक एकता कपूरच्या वीरे दी वेडिंगनं झाला. त्यावेळी हा सिनेमा स्त्रीवादावर असला तरी मी स्त्रीवादी नाही असं करिना म्हणाली होती. मी फेमिनिस्ट नाही, स्त्रीवादी नाही असं सरळ सांगून टाकलं करिना कपूरने. निमित्त होतं वीरे दी वेडिंगच्या म्युझिक लाँचचं. तेव्हा स्त्रीवादी विचारसरणीबद्दल करिनाचं मत विचारता करिना कपूरने मी सैफ अली खानची बायको आहे आणि अभिनेत्री आहे या दोन्ही रूपात लोकांनी मला ओळखलेलं मला आवडतं, माझा स्त्री-पुरुष समानतेवर विश्वास आहे पण मी फेमिनिस्ट नाही असं करिना म्हणाली. करिना नेहमीच तिच्या स्पष्टवक्तेपणाबद्दल ओळखली जाते त्यामुळे अशा प्रकारे तिने आपलं मत जाहीररित्या व्यक्त करण्याची ही पहिली वेळ नाही. पण यामुळे पुन्हा एकदा करिनाचा बिनधास्त अंदाज पाहायला मिळाला.
First published: