News18 Lokmat

शाहीद-मीरानंतर आता अक्षय-करिना देणार गुड न्यूज!

बाॅलिवूडमध्ये आता दुसरी एक गुड न्यूज येतेय आणि तीही करिना-अक्षय कुमार घेऊन येतायत.

News18 Lokmat | Updated On: Sep 10, 2018 12:51 PM IST

शाहीद-मीरानंतर आता अक्षय-करिना देणार गुड न्यूज!

मुंबई, 10 सप्टेंबर : शाहीद कपूर आणि मीराची गुड न्यूज तर आता सगळ्यांना कळली. शाहीदला पहिली मुलगी आणि दुसरा मुलगा झाल्यावर पंकज कपूर म्हणालाही होता, आता आमचं कुटुंब परिपूर्ण झालंय. बाॅलिवूडमध्ये आता दुसरी एक गुड न्यूज येतेय आणि तीही करिना-अक्षय कुमार घेऊन येतायत.

दचकू नका. तुम्ही विचार करताय, अशी ही न्यूज नाहीय. तर करिना कपूर आणि अक्षय कुमार  गुड न्यूज सिनेमात एकत्र असतील. करण जोहर दोघांना या सिनेमातून एकत्र आणणार आहे. राज मेहता सिनेमाचं दिग्दर्शन करेल.

करिना-अक्षय खूप दिवसांनी एकत्र दिसणार आहेत. रावडी राठोड, अजनबी, ऐतराज असे अनेक सिनेमे दोघांनी एकत्र केलेत. त्यांची एकमेकांबरोबरची केमिस्ट्री चांगली खुलून दिसते.

काल अक्कीचा वाढदिवस होता. त्याच्या फिटनेसबद्दल तो भलताच जागरुक आहे. अक्षय रोज 7च्या आत जेवतो. जेवणाबरोबर अक्षय व्यायामाबाबतीत पण तितकाच आग्रही आहे. त्यामुळे तो रोज सकाळी 4:30ला उठतो आणि स्वीमिंग करतो. तसंच मार्शल आर्टस आणि मेडिटेशनसाठी तो रोज एक-एक तास काढतो.

अक्षय त्याचा डाएट चार्ट न चुकता फॉलो करतो. तो नाष्ट्यामध्ये पराठा आणि एक ग्लास दूध पितो, नंतर तो बाऊल भरून फळं खातो. दुपारी जेवणात हिरव्या भाज्या, चपाती, डाळ, चिकन आणि एक वाटी दही असतं. संध्याकाळी एक ग्लास ज्युस आणि रात्रीचं तो फक्त सुप, सॅलेड खातो.

Loading...

करिनाही आपल्या फिटनेसबद्दल काळजी घेते. एका मुलाची आई झाल्यानंतरही करिनानं आपली फिगर चांगली ठेवलीय. त्यामुळे या गुड न्यूजची सगळेच वाट पाहतायत.

'बाजी'मध्ये आणखी एक ट्विस्ट, शेरा जिवंत आहे का?

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला , टि्वटरवर आणि जी प्लस फाॅलो करा

First Published: Sep 10, 2018 12:51 PM IST
Loading...

ताज्या बातम्या

Loading...