करिनाच्या 'वीर दी वेडिंग'ची रिलीज तारीख ठरली

करिनाच्या 'वीर दी वेडिंग'ची रिलीज तारीख ठरली

अभिनेत्री करिना कपूर, सोनम कपूर आणि स्वरा भास्कर यांच्या 'वीर दी वेडिंग' सिनेमाचं दुसर पोस्टर आणि या सिनेमाची रिलीज डेटही शेअर करण्यात आली आहे.

  • Share this:

25 आॅक्टोबर : अभिनेत्री करिना कपूर, सोनम कपूर आणि स्वरा भास्कर यांच्या 'वीर दी वेडिंग' सिनेमाचं दुसर पोस्टर आणि या सिनेमाची रिलीज डेटही शेअर करण्यात आली आहे. सिनेमाची दोन्ही पोस्टर्स अगदी सगळ्याचंच लक्ष वेधून घेणारे आहेत. 'वीर दी वेडिंग' सिनेमाची निर्माती रिया कपूरने या सिनेमाचं पहिलं पोस्टर तिच्या इंस्टाग्राम अकाऊंटवर शेअर केलं आहे.

पहिल्या पोस्टरमध्ये सोनमने करिनाचा चेहरा पंख्याने झाकला आहे, तर करिना डिझायनर लेहेंग्यामध्ये कमालीची सुंदर दिसतेय. स्वरा भास्कर आणि शिखा तल्सानियाही या पोस्टरमध्ये सुंदर दिसत आहेत. यात या सगळ्या जणी लग्नाची तयारी करताना दिसत आहे. तर स्वतः सोनमही या पोस्टरमध्ये भलतीच ग्लॅमरस दिसतेय.

या सिनेमाचं दुसरं पोस्टरही तितकंच प्रभावी आहे. यात सगळ्याच अभिनेत्री शेरवानी घालून आणि पगडी बांधून डान्स करताना दिसत आहेत. करिना कपूरचा कम बॅक सिनेमा आहे. तैमुरच्या जन्मानंतर तिचा हा पहिलाच सिनेमा आहे.

असंही आता लग्नसराईचे दिवस आहेत, त्यामुळे हे पोस्टर मुलींना लग्नासाठी काही स्टाईल टिप्सही देऊ शकतं.

हा सिनेमा 18 मे 2019 मध्ये रिलीज होणार असल्याचं पोस्टरमध्ये लिहिलं आहे. या सिनेमाचं पोस्टर पाहून प्रेक्षकांमध्ये सिनेमाबद्दल उत्सुकता ताणली जाईल एवढं नक्की.

First published: October 25, 2017, 2:09 PM IST

ताज्या बातम्या

corona virus btn
corona virus btn
Loading