• Home
 • »
 • News
 • »
 • entertainment
 • »
 • करिनाच्या मावशीने 16 व्या वर्षी सोडलं घरदार; आयुष्याचे शेवटचे दिवस होते खूप खडतर

करिनाच्या मावशीने 16 व्या वर्षी सोडलं घरदार; आयुष्याचे शेवटचे दिवस होते खूप खडतर

विलक्षण सौंदर्य आणि दमदार अभिनयाच्या जोरावर चाहत्यांची मनं जिंकणारी ही अभिनेत्री दुसरी तिसरी कोणी नाही तर साधना या आहेत.

 • Share this:
  नवी दिल्ली, 2 सप्टेंबर : भारतीय सिनेसृष्टीत अनेक अभिनेत्रींनी (Actress) महत्वपूर्ण योगदान दिलं आहे. दिवंगत अभिनेत्री साधना (Sadhana) हे नाव यापैकीच एक. विलक्षण सौंदर्य आणि दमदार अभिनयाच्या जोरावर साधना यांनी सिनेरसिकांची मनं जिंकली. साधना यांचा पडद्यावरील पेहराव आणि हेअर स्टाईल (Hair Style) ही एकेकाळी तरुणांसाठी लोकप्रिय आणि अनुकरणीय बाब होती. त्यांची हेअर स्टाईल आजही त्यांच्या नावाने ओळखली जाते. अनेक सुपरहिट चित्रपट देऊनही त्यांचं फिल्मी करिअर अल्पकालीनच ठरलं. यशाच्या शिखरावर असतानाच त्यांनी लग्न केलं आणि त्या चित्रपटसृष्टीपासून काहीशा दुरावल्या. अभिनेत्री साधना यांचा आज (2 सप्टेंबर) 80 वा जन्मदिन. बॉलिवूडमधील (Bollywood) आघाडीच्या अभिनेत्री करिना कपूर (Kareena Kapoor) तसेच करिष्मा कपूर (Karishma Kapoor) आणि साधना यांचं जवळचं नातं होतं. या नात्याबाबत कुणालाही फारशी माहिती नाही. साधना यांच्या चित्रपट कारकीर्द आणि जीवनाचा संक्षिप्त आढावा घेणारं वृत्त `आशिया नेट न्यूज हिंदी`नं दिलं आहे. अभिनेत्री साधना यांचा जन्म 2 सप्टेंबर 1941 ला पाकिस्तानमधील कराची (Karachi) येथे झाला. साधना म्हणजेच साधना शिवदासानी ही चित्रपटसृष्टीतील प्रथितयश अभिनेत्रींपैकी एक. त्यांच्या चित्रपटसृष्टीतील यशामध्ये निर्माते सशाधर मुखर्जीचा यांचा महत्वाचा वाटा होता. त्यांच्या `लव्ह इन शिमला` या चित्रपटानं साधना यांना एका रात्रीत सुपरस्टार बनवलं. या चित्रपटातील साधना यांची हेअर स्टाइल आजही त्यांच्याच नावाने ‘साधना कट’ प्रसिद्ध आहे. साधना यांनी बालकलाकार (Child Artist) म्हणून आपल्या कारकिर्दीला सुरवात केली. 1955 मध्ये प्रसिध्द अभिनेते, दिग्दर्शक राज कपूर यांच्या `श्री 420` या चित्रपटातून त्यांनी पदार्पण केले. एका गाण्यात अभिनेत्री नर्गिस यांच्या बाजूला नृत्य करणाऱ्या मुलांमध्ये साधना होत्या. 1958 मध्ये त्यांनी `अबाना` नावाचा पहिला सिंधी चित्रपट साइन केला. यावेळी त्यांना मानधनाची टोकन अमाउंट म्हणून केवळ 1 रुपया देण्यात आला आणि विशेष म्हणजे तो त्यांनी स्वीकारला. त्याच दरम्यान निर्माते सशाधर मुखर्जी आपला मुलगा जॉय मुखर्जी याला चित्रपटसृष्टीत लॉंच करण्याच्या विचारात होते. त्यावेळी एका नियतकालिकात त्यांनी साधना यांचा फोटो पाहिला आणि `लव्ह इन सिमला` या चित्रपटासाठी साधना यांचे नाव अभिनेत्री म्हणून निश्चित केले. लव्ह इन सिमलाचे दिग्दर्शक राम कृष्ण नय्यर यांच्याशी साधना यांनी विवाह केला. लग्नावेळी साधना यांचे वय 16 तर नय्यर यांचे वय 22 वर्ष होते. साधना यांच्या कुटुंबियांना हे लग्न मान्य नव्हते परंतु, यासाठी राज कपूर ( Actor Raj Kapoor) यांनी मध्यस्थी केली. हे ही वाचा-Sidharth Shukla प्रमाणेच 'या' कलाकारांनीही हार्ट अटॅकने गमावला जीव बॉलिवूड अभिनेत्री करिना कपूर आणि करिष्मा कपूर यांचे साधना यांच्याशी जवळचं नातं आहे. करिना, करिष्मा यांची आई बबिता आणि साधना या चुलत बहिणी आहेत. त्यामुळे साधना या करिना आणि करिष्मा कपूर यांच्या मावशी होत. एकेकाळी यशाच्या शिखरावर असणाऱ्या साधना यांच्या जीवनाचा उत्तरार्ध अतिशय वाईट होता. या काळात त्यांना कोणीही मदतीचा हात दिला नाही. शेवटच्या काळात त्या ज्येष्ठ गायिका आशा भोसले यांच्या मुंबईतील जुन्या बंगल्यात वास्तव्यास होत्या. 1995 मध्ये त्यांचे पती नय्यर यांचे निधन झाले. या दांपत्याला मूलबाळ नव्हते. नय्यर यांच्या निधनानंतर साधना एकटया पडल्या होत्या. त्यामुळे त्यांना डिप्रेशनसह अनेक आजारांचा सामना करावा लागला. त्यातच 25 डिसेंबर 2015 मध्ये साधना यांचे निधन झाले.

  First published: