मराठी बातम्या /बातम्या /मनोरंजन /

Alia-Ranbir Mehendi-लेहेंग्यात करिना कपूर तर शेरवानीमध्ये दिसला करण जोहर

Alia-Ranbir Mehendi-लेहेंग्यात करिना कपूर तर शेरवानीमध्ये दिसला करण जोहर

बॉलिवूड   (Bollywood)  अभिनेता रणबीर कपूर आणि आलिया भट्ट  (Alia Bhatt- Ranbir Kapoor Wedding)   यांच्या लग्नाआधीच्या कार्यक्रमांना सुरुवात झाली आहे.43 वर्षांपूर्वी याच दिवशी म्हणजेच 13 एप्रिल 1979 रोजी नीतू-ऋषी यांचा साखरपुडा झाला होता. आलिया-रणबीरने नीतू यांना या दिवसाची आठवण करून देत त्यांचा हा दिवस खास बनवला आहे. आज आलिया-रणबीरच्या मेहंदीचा कार्यक्रम पार पडणार आहे.

पुढे वाचा ...
  • Published by:  Aiman Desai

मुंबई, 13 एप्रिल- बॉलिवूड   (Bollywood)  अभिनेता रणबीर कपूर आणि आलिया भट्ट  (Alia Bhatt- Ranbir Kapoor Wedding)   यांच्या लग्नाआधीच्या कार्यक्रमांना सुरुवात झाली आहे.43 वर्षांपूर्वी याच दिवशी म्हणजेच 13 एप्रिल 1979 रोजी नीतू-ऋषी यांचा साखरपुडा झाला होता. आलिया-रणबीरने नीतू यांना या दिवसाची आठवण करून देत त्यांचा हा दिवस खास बनवला आहे. आज आलिया-रणबीरच्या मेहंदीचा कार्यक्रम पार पडणार आहे. सर्वप्रथम नीतू सिंह मुलगी रिद्धिमा आणि नात समयारासह कार्यक्रमस्थळी पोहोचल्या आहेत.त्यांनतर आता इतर कुटुंबीय आणि कलाकार मित्र यायला सुरुवात झाली आहे.

नुकतंच आलिया भट्टचे वडील आणि सावत्र बहीण महेश भट्ट आणि पूजा भट्ट रणबीरच्या घरी पोहोचले आहेत.इन्स्टंट बॉलिवूडने हे व्हिडीओ शेअर केले आहेत.

रणबीर कपूरच्या चुलत बहिणी आणि प्रसिद्ध अभिनेत्री असणाऱ्या करिना कपूर आणि करिश्मा कपूर रणबीरच्या घरी दाखल झाल्या आहेत. यावेळी बेबोने पांढऱ्या रंगाचा लेहेंगा तर लोलोने पिवळ्या रंगाची साडी नेसली होती.

रणबीर कपूर आणि आलियाच्या आगामी 'ब्रह्मास्त्र' चा दिग्दर्शक आणि त्यांचा सर्वात जवळचा मित्र अयान मुखर्जीसुद्धा मेहंदीसाठी पोहोचला आहे. यावेळी तो ट्रॅडिशनल लुकमध्ये दिसून आला.

प्रसिद्ध बॉलिवूड दिग्दर्शक करण जोहरसुद्धा शेरवानीमध्ये कार्यक्रमाच्या ठिकाणी पोहोचला आहे. करण आलियाला आपली मुलगी समजतो. त्यामुळे हा क्षण त्याच्यासाठीसुद्धा खास आहे.

रणबीर कपूरची आत्ती आणि ऋषी कपूर यांची बहीण रीमा जैनसुद्धा आपल्या मुलांसोबत पोहोचल्या आहेत.

First published:

Tags: Alia Bhatt, Bollywood News, Entertainment, Kareena Kapoor, Ranbir kapoor