मराठी बातम्या /बातम्या /मनोरंजन /

Kareena Kapoor: करीना कपूरच्या व्हॅनिटीची व्हॅनची झालीये अशी अवस्था; नेमकं काय घडलं?

Kareena Kapoor: करीना कपूरच्या व्हॅनिटीची व्हॅनची झालीये अशी अवस्था; नेमकं काय घडलं?

करीना कपूर

करीना कपूर

बॉलिवूड अभिनेत्री करीना कपूर खान सोशल मीडियावर प्रचंड सक्रिय असते. बेबो सतत सोशल मीडियावर फोटो किंवा व्हिडिओ शेअर करत असते. ती नियमित चाहत्यांना आपल्या खाजगी आयुष्याबाबत नवनवीन अपडेट देत असते.

  • News18 Lokmat
  • Last Updated :
  • Maharashtra, India
  • Published by:  Aiman Desai

मुंबई, 27  सप्टेंबर-   बॉलिवूड अभिनेत्री करीना कपूर खान सोशल मीडियावर प्रचंड सक्रिय असते. बेबो सतत सोशल मीडियावर फोटो किंवा व्हिडिओ शेअर करत असते. ती नियमित चाहत्यांना आपल्या खाजगी आयुष्याबाबत नवनवीन अपडेट देत असते. करीनाची जबरदस्त फॅन फॉलोइंग आहे. काही वेळेपूर्वी अभिनेत्रीने आपल्या टीमसोबत काही फोटो शेअर केले आहेत. फोटो शेअर करत अभिनेत्रीने सांगितलं की, हे फोटो तिच्या व्हॅनिटी व्हॅनचे आहेत. यामध्ये करीना सेलिब्रिटी हेअरस्टाइलिस्ट यियानी त्साप्तोरी, स्टायलिस्ट लक्ष्मी लहर आणि इतरांसोबत जेवणाचा आस्वाद घेताना दिसून आली. हे फोटो सध्या सोशल मीडियावर चर्चेत आहेत.

नुकतंच करीना कपूरने आपल्या इन्स्टाग्राम अकाउंटवर हे फोटो शेअर केले आहेत.फोटोसोबतच अभिनेत्रीच्या कॅप्शनने सर्वांचं लक्ष वेधून घेतलं आहे. फोटो शेअर करत करीनाने लिहलंय, व्हॅनिटी व्हॅनमध्ये नेमकं काय होतं? व्हॅनिटी व्हॅन आणि आमचे हिप्स..”. करीनाने शेअर केलेला पहिला फोटो हा तिचा सेल्फी आहे. ज्यामध्ये ती एका एथनिक लुकमध्ये दिसून येत आहे. करीना डोळ्यात काजळ घातला आहे. कपाळावर टिकली लावली आहे. आणि कानात भरदार असे झुमके घातले आहेत. अभिनेत्रीचा हा लुक फारच रॉयल दिसत आहे.

फोटोमध्ये काही लोकांना करीना सुंदर दिसत आहे. तर काही सोशल मीडिया युजर्सनी अभिनेत्रीला ट्रोल केलं आहे. या लोकांना अभिनेत्रीचा लुक फारसा भावलेला नाहीय. करीनाच्या लुकची खिल्ली उडवत तिला प्रचंड ट्रोल करण्यात आलं आहे. अभिनेत्रीच्या पोस्टवर कमेंट करत एका यूजरने तिला विचारलंय - तुझे ओठ इतके कोरडे का वाटत आहेत? तर आणखी एका युजरने, तू पूर्णपणे म्हातारी दिसत असल्याचं लिहलंय. अशा अनेक तिखट कमेंट्ससुद्धाया फोटोवर पाहायला मिळत आहेत.

करीना कपूरच्या या फोटोंवर तिच्या चाहत्यांनी मात्र सुंदर-सुंदर कमेंट्स दिल्या आहेत. शिवाय अनेक सेलिब्रेटींनीसुद्धा कमेंट्स देत आपलं प्रेम व्यक्त केलंय. अभिनेत्री सोनम कपूरची बहीण आणि ज्येष्ठ अभिनेते अनिल कपूरची धाकटी लेक रिया कपूरनेसुद्धा बेबोच्या फोटोवर कमेंट केली आहे. रियाने मजेशीर कमेंट करत लिहलंय, 'स्कॅम व्हॅन'.

(हे वाचा:Shilpa shetty : शिल्पा शेट्टीने पुरवले प्रेग्नेंट आलियाचे डोहाळे; मध्यरात्रीच आलियाला दिलं खास सरप्राईज )

व्यावसायिक आयुष्याबाबत सांगायचं तर,करीना कपूर नुकतंच आमिर खानसोबत 'लाल सिंग चड्ढा'मध्ये दिसली होती. आगामी काळात ती सुजॉय घोषच्या 'द डिव्होशन ऑफ सस्पेक्ट एक्स'मध्ये अभिनेता जयदीप अहलावत आणि विजय वर्मासोबत दिसणार आहे. हा चित्रपट नेटफ्लिक्सवर रिलीज होणार आहे. या प्रोजेक्टसह करीना कपूर आपला ओटीटी डेब्यू करणार आहे. या चित्रपटाशिवाय करीना हंसल मेहता यांच्या थ्रिलर प्रोजेक्टमधून निर्माता म्हणूनही पदार्पण करणार आहे.

First published:

Tags: Bollywood News, Entertainment, Kareena Kapoor