Home /News /entertainment /

तैमूरच्या वेळी नावावरुन झाला होता वाद; दुसऱ्या बाळाच्या नावाबद्दल सैफिनाची भन्नाट आयडिया

तैमूरच्या वेळी नावावरुन झाला होता वाद; दुसऱ्या बाळाच्या नावाबद्दल सैफिनाची भन्नाट आयडिया

तैमूरच्या जन्माच्या वेळी बाळाचं नाव काय ठेवायचं यावरुन वाद झाला होता. यावेळी सैफ अली खान (Saif Ali khan) आणि करीना कपूरने (Kareena Kapoor) भन्नाट आयडिया केली आहे.

  मुंबई, 10 डिसेंबर: बॉलिवूडचं हॉट कपल सैफ अली खान (Saif Ali Khan) आणि करीना कपूर (Kareena Kapoor) लवकरच पुन्हा आई बाबा होणार आहेत. त्यामुळे या बाळाचं नाव काय ठेवणार ? असा प्रश्न चाहत्यांना पडला आहे. हाच प्रश्न खुद्द करीना कपूरला एका टॉक शॉमध्ये विचारण्यात आला. त्यावर तिनेही अगदी मोकळेपणाने उत्तर दिलं. काही दिवसांपूर्वी करीना कपूर नेहा धूपियाच्या टॉक शोमध्ये सेलिब्रिटी गेस्ट म्हणून गेली होती. तेव्हा नेहा धूपियाने सगळ्याच चाहत्यांच्या मनातला प्रश्न तिला विचारला. तिने विचारलं तू प्रेग्नंट आहेस हे समजल्यावर तुझ्या कुटुंबातील किंवा मित्र परिवारापैकी कोणी तुला बाळासाठी नाव सुचवलं आहे का? त्यावर करीनाने तैमूरच्या वेळी जो प्रकार घडला त्याचा खुलासा केला. करीना कपूर म्हणाली, ‘तैमूरच्या वेळी माझ्यात आणि सैफमध्ये त्याचं नाव काय ठेवायचं यावरुन वाद झाले होते. त्यामुळे यावेळी आम्ही आधीच कोणतंही नाव ठरवलेलं नाही. जेव्हा आम्हाला बाळ होईल तेव्हाच आम्ही त्याचं नाव ठरवू आणि आमच्या सगळ्या चाहत्यांना छान सप्राईज देऊ.’
  सप्टेंबर 2020 करीनाने तिच्या गुडन्यूजबद्दल चाहत्यांना सांगितलं. ही खबर ऐकल्यानंतर चाहत्यांनी तिच्यावर कौतुकाचा वर्षाव केला होता. सैफ आणि करीनाचे नवे प्रोजेक्ट्स कामाच्या बाबतीत बोलायचं झालं तर करीनाने नुकतंच लाल सिंह चढ्ढा सिनेमाचं शूटिंग पूर्ण केलं आहे. या सिनेमामध्ये ती आमिर खानसोबत झळकणार आहे. लाल सिंह चढ्ढा या सिनेमातील आमिरच्या लूकची बरीच चर्चा झाली होती. तर सैफ अली खानने नुकतंच भूत पुलिस या सिनेमाचं शूटिंग पूर्ण केलं आहे.
  Published by:Amruta Abhyankar
  First published:

  Tags: Kareena Kapoor, Saif Ali Khan

  पुढील बातम्या