14 वर्षाची असताना मुलाला भेटण्यासाठी करीना कपूरने केला भलताच उपद्व्याप

14 वर्षाची असताना मुलाला भेटण्यासाठी करीना कपूरने केला भलताच उपद्व्याप

अभिनेत्री करीना कपूरचं (Kareena Kapoor) नाव आज बॉलिवूडच्या टॉप अभिनेत्रींमध्ये घेतलं जातं पण लहान असताना ती अतिशय खोडकर होती.

  • Share this:

मुंबई, 20 डिसेंबर: अभिनेत्री करीना कपूरचं (Kareena Kapoor) नाव बॉलिवूडच्या टॉप अभिनेत्रींमध्ये घेतलं जातं. सिनेसृष्टीमध्ये जवळजवळ गेली 20 वर्ष ती काम करत आहे. आत्ताची ग्लॅमरस, हॉट अभिनेत्री लहानपणी मात्र अतिशय खोडकर होती. तिच्या मस्तीला कंटाळून तिच्या आईने तिला बोर्डिंग स्कूलला पाठवलं होतं. करीनाने नुकत्याच दिलेल्या एका मुलाखतीमध्ये तिच्या मस्तीखोरपणाचा एक किस्सा सांगितला होता.

करीना सांगते, ’माझ्या आईवर एकल मातृत्वाची जबाबदारी होती. त्यामुळे आम्ही लहान असताना ती आमच्यासोबत कधीकधी खूपच कठोर होत असे. मी 14 -15 वर्षांची असताना मला एक मुलगा आवडत होता. मला त्याला भेटायला जावसं वाटायचं. त्याच्याशी फोनवरुन बोलावसं वाटायचं पण ज्या खोलीत फोन होता त्या खोलीला आई कुलूप लावून जायची. त्यामुळे मला त्याच्याशी बोलणं जमत नव्हतं. आई एके दिवशी डिनरसाठी बाहेर गेलेली असताना मी चाकूने त्या खोलीचं कुलूप तोडलं, मित्रमैत्रिणींसोबत त्याला भेटायचा प्लॅन आखला आणि कोणालाही न सांगता त्याला भेटायला गेले. माझा हा प्रताप ऐकून आई प्रचंड अस्वस्थ झाली आणि तिने मला डेहराडूनला बोर्डिंग स्कूलला पाठवण्याचा निर्णय घेतला. मी त्यावेळी केलेला खोडकरपणा योग्य नव्हता हे मला आज आई झाल्यावर समजत आहे.’

बेबोचे आगामी चित्रपट

वर्कफ्रंटबद्दल बोलायचं झालं तर, करीना कपूर आमिर खानसमवेत 'लालसिंग चड्ढा' चित्रपटात दिसणार आहे. ऑक्टोबरमध्ये तिनं शूटिंग पूर्ण केलं आहे. या चित्रपटाशिवाय करीना कपूर करण जोहरच्या मल्टीस्टारर फिल्म 'तख्त' मध्ये काम करताना दिसणार आहे.

Published by: Amruta Abhyankar
First published: December 20, 2020, 11:31 AM IST

ताज्या बातम्या