मराठी बातम्या /बातम्या /मनोरंजन /करीनाच्या ऑनस्क्रीन बहिणीच्या घरी लागलेली आग, लोकांना वाटलं 'एप्रिल फूल',मग घडलं भयानक

करीनाच्या ऑनस्क्रीन बहिणीच्या घरी लागलेली आग, लोकांना वाटलं 'एप्रिल फूल',मग घडलं भयानक

करीना कपूरची ऑनस्क्रीन बहीण तनाज इराणीच्या घरी लागलेली आग

करीना कपूरची ऑनस्क्रीन बहीण तनाज इराणीच्या घरी लागलेली आग

April Fool Incident: एप्रिलच्या पहिल्या दिवशी प्रत्येकजण एकमेकांचा एप्रिल फुल करण्याच्या मूडमध्ये असतो. पण एकेकाळी हा दिवस टीव्ही आणि चित्रपट अभिनेत्री तनाज ईरानी साठी खूप कठीण होता.

  • News18 Lokmat
  • Last Updated :
  • Maharashtra, India

मुंबई, 2 एप्रिल- एप्रिलच्या पहिल्या दिवशी प्रत्येकजण एकमेकांचा एप्रिल फुल करण्याच्या मूडमध्ये असतो. पण एकेकाळी हा दिवस टीव्ही आणि चित्रपटांमधील प्रसिद्ध अभिनेत्री तनाज ईरानी साठी खूप कठीण होता. सांगायचं झालं तर, काही वर्षांपूर्वी 1 एप्रिलच्या दिवशी तनाज आणि बख्तियारच्या घरात आग लागली होती. परंतु एप्रिल फूलमुळे त्यांच्या बोलण्यावर कोणीही विश्वास ठेवला नाही. संपूर्ण 45 मिनिटे दोघांनाही अनेक अडचणींचा सामना करावा लागला. काय आहे हा संपूर्ण प्रकार आपण जाणून घेऊया.

अभिनेत्री डेल्नाज ईरानीची वहिनी तनाज इराणी चित्रपट किंवा टीव्हीपासून सध्या दूर आहे. पण एक काळ असा होता जेव्हा तनाज बिग बजेट चित्रपटांमध्ये मुख्य कलाकाराची बहीण किंवा मैत्रिणीच्या भूमिकेत दिसून येत होती. पण गेल्या अनेक दिवसांपासून अभिनेत्री तनाज पदड्यावरुन गायब आहे. पण काही वर्षापूर्वी याच दिवशी त्यांच्या घरी एक भयानक घटना घडली होती. 1 एप्रिलच्या दिवशी जिथे सगळे एकमेकांशी चेष्टा करण्याच्या मूडमध्ये दिसतात तिथे तनाज मात्र अडचणीत आली होती. अशा स्थितीत तिने आपल्या नातेवाईकांना फोन करुन याबाबतची माहिती दिल्यावर कोणीही तिच्यावर विश्वास ठेवायला तयार नव्हतं. सगळ्यांना वाटलं की ती मस्करी करत आहे.

(हे वाचा: Sai Pallavi: कधीच मेकअप का नाही करत साई पल्लवी? साऊथ सुंदरीने सांगितलं खरं कारण)

तनाजने खूप वर्षांपूर्वी आपल्या एका मुलाखतीदरम्यान हे सांगितलं होतं. याबाबत बोलताना ती म्हणाली, 'मी आणि बख्तियार खोलीत झोपलो होतो. खोलीत मुलांसह उपस्थित असलेल्या घरात काम करणाऱ्या व्यक्तीचा मोठ्याने ओरडण्याचा आवाज येऊ लागला. मी त्या आवाजाने दचकून उभी राहिले. आणि मी लगेच बख्तियारला उठवलं तो पटकन उठून पळत बाहेर गेला. तिथं पाहून तो परत आला तर त्याची अवस्था खूप वाईट झाली होती. कारण आमच्या घरात भीषण आग लागली होती. पहिल्यांदाच इतकी आग पाहून आम्ही घाबरुन गेलो होतो'.

काही वेळ काय करावं आम्हाला समजत नव्हतं. आजूबाजूच्या लोकांनीही आग विझवण्याचा प्रयत्न केला. अग्निशमन दलही वेळेवर आलं होतं. पण तब्बल 45 मिनिटे आग आटोक्यात आणण्यासाठी सगळे झटत होते. पण जेव्हा मी हे माझ्या कुटुंबीयांना आणि मित्रांना सांगायला फोन केला. तेव्हा कोणीही आमच्यावर विश्वास ठेवला नाही. आम्ही त्यांना एप्रिल फूल बनवतोय असं सगळ्यांना वाटत होतं''. असं तनाज म्हणाली.

तनाज आणि बख्तियार यांनी 2007 मध्ये लग्नगाठ बांधली होती. तनाजने आपल्या अभिनय कारकिर्दीत अनेक मोठ्या स्टार्ससोबत काम केलं आहे. ती मुख्य भूमिकेत झळकली नसली तरी एक महत्वपूर्ण सहाय्यक अभिनेत्रीची भूमिका तिने साकारली आहे. तनाजच्या चित्रपटांबद्दल बोलायच झालं तर, तनाजने 'हद कर दी आपने', 'मैं प्रेम की दिवानी हूं', 'कुछ ना कहो' आणि '36 चायना टाउन' सारख्या चित्रपटांमध्ये अनेक दमदार भूमिका साकारल्या आहेत. टीव्ही मालिकांबद्दल सांगायचं तर ती 'श्री', 'स्वाभिमान' आणि 'मेरी बीवी वंडरफुल'मध्येही दिसली.

First published:
top videos

    Tags: Bollywood actress, Entertainment, Tv actress