मुंबई, 27 ऑगस्ट : बॉलिवूड अभिनेत्री अनुष्का शर्मा (anushka sharma) आणि क्रिकेटर विराट कोहली (virat kohali) यांनी आपल्या घरी नवा पाहुणा येणार असल्याची घोषणा केली. यानंतर अभिनेत्री करीना कपूर (kareena kapoor) आणि अभिनेता सैफ अली खानचा (saif ali khan) मुलगा तैमूर (taimur) अली खान सोशल मीडियावर जबरदस्त ट्रेंड झाला. दरम्यान आता तैमूरची आजी आणि करीनाची सासू शर्मिला टागोर (sharmila tagore) यांचा एक थ्रोबॅक व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल होतो आहे.
शर्मिला टागोर यांचा हा व्हिडीओ एक वर्ष जुना आहे. करीना कपूरचा शो इश्क एफएममध्ये त्या सहभागी झाल्या होत्या. या टॉक शोमध्ये शर्मिला टागारो पटौदी कुटुंब आणि फिल्म इंडस्ट्रीशी संबंधित अनेक गोष्टी शेअर केल्या होत्या. यावेळी करीना कपूरने तैमूरसंबंधित प्रश्न विचारला होता आणि त्यावेळी शर्मिला यांनी विराट आणि अनुष्काच्या मुलाचा उल्लेख केला होता.
करीनाने मीडिया तैमूरला किती प्राधान्य देत आहे, याबाबत शर्मिला यांना विचारलं त्यावेळी शर्मिला म्हणाल्या, सोशल मीडिया हा चिंतेचा विषय आहे. तुमची मुलं खूप काही शिकतात तुम्ही त्यावर नियंत्रण नाही करू शकत. जेव्हा तो स्वत: सोशल मीडियावर येण्यास उत्सुक असेल आणि त्याच्याबाबत किती बोललं जातं आहे याची माहिती त्याला होईल"
शर्मिला पुढे म्हणाल्या, "मला वाटतं सोशल मीडिया सुरुवातील तुम्हाला उचलून धरतं आणि नंतर पटकन खाली पाडतं. उद्या जेव्हा विराट कोहली आणि अनुष्का शर्माला मूल होईल आणि तैमूरकडे मग दुर्लक्ष केलं जाईल", यावर करीनानेदेखील असंच होवो अशी मला आशा आहे, अशी प्रतिक्रिया दिली आहे.
हे वाचा - लग्नाआधी प्रेग्नेंट होत्या या बॉलिवूड अभिनेत्री, नावं वाचून विश्वास बसणार नाही
तैमूर या मीडिया फ्रेंडली मुलगा आहे. त्याच्या क्युटनेसमुळे मीडियादेखील त्याला खूप प्रेम देतं. आता विराट, अनुष्काचा मूल येणार म्हटल्यावर आता तैमरचीही चर्चा सुरू झाली. त्याच्यावर अनेक मिम्स येऊ लागले आहेत.
मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.
Tags: Taimur, Virat kohali