मराठी बातम्या /बातम्या /मनोरंजन /

Video: करीना कपूरला विमानतळावर चाहत्यांकडून त्रास, बेबोचे वागणे चर्चेत

Video: करीना कपूरला विमानतळावर चाहत्यांकडून त्रास, बेबोचे वागणे चर्चेत

करीना कपूर

करीना कपूर

बॉलिवूड अभिनेत्री करीना कपूर खान लोकप्रिय अभिनेत्रींपैकी एक आहे. जिची लोकप्रियता अफाट असून मोठ्या प्रमाणावर चाहतावर्ग आहे. त्यामुळे करीना कायमच कोणत्या न कोणत्या कारणावरुन चर्चेत असते.

  • News18 Lokmat
  • Last Updated :
  • Mumbai, India
  • Published by:  Sayali Zarad

मुंबई, 3 ऑक्टोबर : बॉलिवूड अभिनेत्री करीना कपूर खान लोकप्रिय अभिनेत्रींपैकी एक आहे. जिची लोकप्रियता अफाट असून मोठ्या प्रमाणावर चाहतावर्ग आहे. त्यामुळे करीना कायमच कोणत्या न कोणत्या कारणावरुन चर्चेत असते. अशातच करीनाचा नवा व्हिडीओ समोर आला आहे. यामध्ये ती एअरपोर्टवर दिसत आहे. मात्र यावेळी करीना संकटात सापडली असून तिच्या चाहत्यांवर नाराज झाल्याची दिसत आहे.

करीना कपूर खान नुकतीच मुंबई विमानतळावर दिसली. करीना कपूर एकटीच कारमधून खाली उतरून विमान पकडण्यासाठी विमानतळावर जात होती. अशा स्थितीत तिथे उपस्थित असलेल्या तिच्या चाहत्यांनी एकद गर्दी केल्याची पहायला मिळाली. यावेळी तिच्यासोबत फोटो काढण्यासाठी चाहत्यांनी गोंधळ केला. काहींनी करीनाची पर्स ओढली तर कोणीतरी तिच्या खांद्यावर हात ठेवून फोटो काढण्याचा प्रयत्न केला. मात्र या सगळ्या परिस्थितीला शांततेत साभाळल्याबद्दल चाहत्यांनी तिचं कौतुक केलं आहे.

व्हिडीओमध्ये करीना सुद्धा खूप रागावलेली दिसत आहे आणि ती तिथून पळून जाण्याचा प्रयत्न करत आहे. मात्र चाहते तिला जाऊ देत नसल्याचं दिसत आहे.या व्हिडीओवर अनेक प्रतिक्रिया येत आहेत. 'ती घाबरली आहे, यार ती सार्वजनिक मालमत्ता नाही, तिला जाऊद्या यार, ती पण एक माणूस आहे', अशा अनेक कमेंट चाहते करत आहेत.

दरम्यान, आपल्या आवडत्या स्टार्सची एक झलक पाहण्यासाठी चाहते उत्सुक आहेत. अशा परिस्थितीत, जेव्हा त्यांना त्यांच्या आवडत्या स्टारला भेटण्याची संधी मिळते, तेव्हा काहीवेळा ते उत्साहात त्यांचा संयम गमावतात. अशीच घटना करीना कपूरसोबत घडल्याचं दिसत आहे.

First published:

Tags: Bollywood, Bollywood actress, Bollywood News, Kareena Kapoor