नेटीझन्सनी केलेल्या 'आंटी' कमेंटवर, करिनाने दिलं जशास तसं उत्तर

नेटीझन्सनी केलेल्या 'आंटी' कमेंटवर, करिनाने दिलं जशास तसं उत्तर

एका युझरनं करीनाला 'आता तू काकू झाली आहेस त्यामुळे लहान मुलांसारखं वागणं बंद कर,' असा सल्ला दिला होता.

  • Share this:

मुंबई, 9 मार्च : अभिनेता अरबाज खान सध्या 'Pinch By Arbaaz Khan' या त्याच्या नव्या यूट्युब शोमुळे चर्चेत आहे. नुकताच या शोचा ट्रेलर प्रदर्शित झाला. या ट्रेलरमध्ये अरबाज खान बॉलिवूड कलाकारांना सोशल मीडियाच्या माध्यमातून सेलिब्रिटींवर केल्या जाणाऱ्या कमेंट आणि ट्रोलिंगबद्दल प्रश्न विचारताना दिसत आहे. अरबाजच्या या शोमध्ये करण जोहर, सोनम कपूर, करीना कपूर, सोनाक्षी सिन्हा, नवाजुद्दीन सिद्दीकी, कपिल शर्मा, सनी लिओन आदी कलाकारांनी हजेरी लावली होती. पण करीनाला एका युझरने ट्विटरवर 'आंटी' अशी कमेंट केली होती त्याविषयी प्रश्न विचारण्यात आला. त्यावर करीना काहीशी नाराज झालेली दिसली.

अभिनेत्री करीना कपूरला काही दिवसांपूर्वी ट्विटरवर ट्रोल करण्यात आलं होतं. एका युझरनं तिला 'आता तू काकू झाली आहेस त्यामुळे लहान मुलांसारखं वागणं बंद कर,' असा उपहासात्मक सल्ला दिला होता. याच कमेंटवर अरबाजनं करीनाला 'पिंच बाय अरबाज खान, या त्याच्या शोमध्ये प्रश्न विचारला. यावेळी करीना थोडी नाराज झालेली दिसली. 'सेलिब्रेटी, अभिनेता किंवा अभिनेत्री यांना भावना नसतात. त्यामुळे त्यांनी फक्त हे सर्व ऐकून घ्यायचं.' असं उपरोधिक मतं तिनं यावेळी मांडलं.


सध्या सोशल मीडियावरील वाढत्या ट्रोलिंगवर सर्वच सेलिब्रेटी नाराज आहे. त्यांच्या मते या प्रकाराला आळा घालण्यासाठी सोशल मीडियाविषयक कायद्यांमध्ये काही कठोर नियमांचा समावेश करायला हवा. ज्यामुळे युझर्स कोणत्याही पोस्टवर अशाप्रकारे असभ्य भाषेत टीका करण्याचे प्रमाण कमी होईल. कारण सेलिब्रेटींनाही त्यांचं वैयक्तिक आयुष्य असतं, स्वतःचे विचार आणि असतात आणि अशाप्रकारच्या कमेंटमुळे अनेकदा त्यांचं मानसिक खच्चीकरण होतं असल्याचं सेलिब्रेटींचं म्हणणं आहे.

करीना कपूर सध्या अक्षय कुमारच्या 'गुड न्यूज' चित्रपटाच्या शुटींगमध्ये व्यस्त आहे. या चित्रपटात करीना आणि अक्षय व्यतिरिक्त कियारा अडवाणी आणि दिलजीत दोसांझ यांच्याही भूमिका असून येत्या 6 सप्टेंबरला हा चित्रपट चित्रपटगृहात प्रदर्शित होणार आहे.

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला आणि टि्वटरवर फाॅलो करा

First Published: Mar 9, 2019 03:47 PM IST

ताज्या बातम्या