Elec-widget

Video : करिना कपूर आता नव्या भूमिकेत

Video : करिना कपूर आता नव्या भूमिकेत

हल्ली बाॅलिवूडचे कलाकार फक्त सिनेमात काम करतात असं नाही. तर ते इतर मीडियावरही संचार करत असतात.

  • Share this:

मुंबई, 9 डिसेंबर : हल्ली बाॅलिवूडचे कलाकार फक्त सिनेमात काम करतात असं नाही. तर ते इतर मीडियावरही संचार करत असतात. मग टीव्ही, वेबसाईट्स, यु ट्युब, रेडिओ अशा सगळ्याच ठिकाणी त्यांचा वावर असतो आणि त्यांचे फॅन्स हे सगळं फाॅलोही करतात.

अभिनेत्री करिना कपूर खान ही नेहमीच आपल्याला टीव्हीवर दिसत आलीये. आता करिना एका रेडिओ शोमधून प्रेक्षकांच्या भेटीला येणारे. 'व्हॉट वुमन वॉन्ट विथ करिना कपूर खान' या रेडिओ शोमधून करिना प्रेक्षकांच्या भेटीला येतेय. या शोचा प्रोमा सध्या सोशल मीडियावर रिलीज झालाय. 10 डिसेंबरपासून इश्क 104.8 या रेडिओ चॅनलवर करिनाचा हा शो प्रेक्षकांना ऐकता येणारे.
Loading...

अर्थात, याचबरोबर प्रेक्षकांना एक व्हिज्युअल ट्रीटही असेल. म्हणजे रेडिओ चॅनेलच्या वेबसाईटवर करिना कपूर खान सेलिब्रिटींशी गप्पा मारताना दिसेल.

या शोमध्ये करिष्मा कपूर, सनी लिओन, मनीष मल्होत्रा, स्वरा भास्कर, अमृता अरोरा असे बरेच सेलिब्रिटीज असतील. करिना सगळ्यांबरोबर गप्पा मारत धमाल करेल.

करिना कपूरचं लव्ह लाईफ कधीच लपून राहिलं नाहीय. तिच्या दिलखुलास स्वभावामुळे ते सगळ्यांपर्यंत पोचलंय. अगदी शाहीद कपूरपासून सैफ अली खानपर्यंतची सर्व रिलेशनशिप सगळ्यांना माहीत आहेत.

करिना कपूर ज्या नात्यात खूप पाॅझिटिव्ह होती ते होतं शाहीदसोबतचं. 2004मध्ये फिदाच्या सेटवर दोघं भेटले.शाहीदसाठी करिना शाकाहारीही बनली. पण त्याच वेळी तिचं आणि सैफचं सूत जुळलं. शाहीदला हे कळल्यावरच त्यानं ब्रेकअप केलं.

काही काळ करिना आणि फरदीन खान यांच्याही अफेअरची चर्चा होती. दोघं अनेकदा एकत्र दिसायचे.

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला आणि टि्वटरवर फाॅलो करा

First Published: Dec 9, 2018 10:51 AM IST
Loading...

ताज्या बातम्या

Loading...