शाहिद कपूरशी ब्रेकअप, 13 वर्षांनंतर करिनानं केला धक्कादायक खुलासा

शाहिद कपूरशी ब्रेकअप, 13 वर्षांनंतर करिनानं केला धक्कादायक खुलासा

शाहिद कपूरशी ब्रेकअपबद्दल 13 वर्षांनंतर करिनानं धक्कादायक खुलासा केला.

  • Share this:

मुंबई, 21 फेब्रुवारी : अभिनेत्री करिना कपूर आणि शाहिद कपूर हे एकेकाळचं बॉलिवूडचं बहुचर्चित कपल राहिले आहेत. बरीच वर्षं हे दोघंही एकमेकांना डेट करत होते. या दोघांनी एकत्र अनेक सिनेमा सुद्धा केले. या जोडीला प्रेक्षकांनी अक्षरशः डोक्यवर घेतलं होतं पण अशातच दोघांनी ब्रेकअप केलं. त्यानंतर करिनानं सैफ अली खानशी लग्न केलं आणि शाहिद कपूर मीरा राजपूतशी लग्नाच्या बेडीत अडकला. पण आता शाहिद कपूरशी ब्रेकअपबद्दल 13 वर्षांनंतर करिनानं धक्कादायक खुलासा केला.

करिना कपूर आणि शाहिद कपूर यांनी इम्तियाज अली यांच्या 'जब वी मेट'मध्ये एकत्र काम केलं होतं. यादरम्यानच त्यांच्या ब्रेकअपच्या चर्चा सुरू झाल्या होत्या. त्यानंतर काही वर्षांनी करिनानं सैफशी लग्न केलं. नुकतीच करिना अनुपमा चोप्राला दिलेल्या एका मुलाखतीत शाहिद कपूरशी ब्रेकअप ते सैफ अली खानशी लग्न या सर्व प्रवासाविषयी बिनधास्त बोलली.

FILMFARE नामांकनाबद्दल यामीने अखेर सोडलं मौन, शेअर केलं खुलं पत्र

शाहिद कपूरशी ब्रेकअपबद्दल बोलताना करिना म्हणाली, ‘तुमच्या नशिबाचे स्वतःचे काही वेगळे प्लान असतात आणि तुमचं आयुष्य त्यानुसार चालतं. 'जब वी मेट'चं शूटिंग आणि 'टशन' सिनेमा या दरम्यान काही गोष्टी अशाप्रकारे घडल्या की माझं आयुष्य त्यामुळे बदलून गेलं आणि माझे आणि शाहिदचे रस्ते बदलले.’

रणबीरच्या आईचा TikTok डेब्यू, 'COOL आजी'चा नातीबरोबरचा VIDEO VIRAL

'जब वी मेट'मध्ये करिनान साकारलेल्या भूमिकेचं नाव गीत होतं. या भूमिकेचा आधार घेत करिना म्हणाली, ‘त्यावेळी माझ्या जीवनात आणि गीतच्या जीवनात होत असलेल्या अनेक गोष्टी सारख्या होत्या. त्यावेळी खासगी आणि प्रोफेशनल लाइफ दोन्ही सांभाळणं कठीण झालं होतं. सिनेमाच्या सेकंड हाफमध्ये ज्याप्रमाणे गीतचं आयुष्य बदललं त्याप्रमाणे माझंही आयुष्य बदलत गेलं.’

 

View this post on Instagram

 

Caption This !! 😂

A post shared by Kareena Kapoor Khan (@therealkareenakapoor) on

करिना कपूर 'जब वी मेट' आणि 'टशन' हे दोन्ही सिनेमा तिच्या आयुष्यातील सर्वात खास सिनेमा असल्याचं सांगते. 'जब वी मेट'नं तिचं आयुष्य बदलून टाकलं तर दुसरीकडे 'टशन' सिनेमाच्या सेटवर तिच्या आयुष्यात सैफ आला आणि अखेर तो तिचा लाइफ पार्टनर सुद्धा झाला. 2007 मध्ये 'जब वी मेट' रिलीज झाला होता. पण या सिनेमाच्या शूटिंग दरम्यान करिना आणि शाहिद यांच्यातील नातं बिघडत गेलं होतं. या सिनेमानंतर करिनानं 'टशन' सिनेमात काम केलं ज्यात सैफ आणि अक्षय कुमार यांच्या महत्त्वपूर्ण भूमिका होत्या. यावेळी सैफ-करिनानं एकमेकांना डेट करायला सुरूवात केली आणि 2012 मध्ये या दोघांनी लग्न केलं. तर 2015 मध्ये शाहिदनं मीरा राजपूतशी लग्न केलं.

सुरेश रैनाचं क्रश मराठमोळी अभिनेत्री, डेट करण्याची होती इच्छा

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला आणि टि्वटरवर फाॅलो करा

First Published: Feb 21, 2020 09:55 AM IST

ताज्या बातम्या