मुंबई, 08 डिसेंबर: बॉलिवूड अभिनेत्री करीना कपूर (Kareena Kapoor) नुकतीच धरमशाला इथून मुंबईमध्ये परतली आहे. वांद्र्याला ती सैफ अली खानसोबत एका ठिकाणी जाताना दिसली. पण यावेळी ती चक्क विनामास्क फिरताना दिसली. तिचे आणि सैफ अली खानचे (Saif Ali Khan) वांद्र्यातले फोटो व्हायरल झाले आहेत. या फोटोंमुळे ती बरीच ट्रोल होत आहे.
प्रेग्नन्सीमुळे तिच्या चेहऱ्यावर छान ग्लो आला आहे. आधीच कोरोना आणि पोटात बाळ आहे. त्यामुळे तब्येतीची काळजी घे असं आवाहन तिच्या चाहत्यांनी केलं आहे. तिच्यासोबत सैफही स्पॉट झाला आहे. प्रेग्नसीच्या काळातही करीना शूटिंग करत होती. तिने लाल सिंह चढ्ढा या सिनेमाचं शूटिंग पूर्ण केलं आहे. या सिनेमामध्ये करीनासोबत आमिर खानचीही मुख्य भूमिका असणार आहे. मोना सिंह (Mona Singh), करीना कपूर खान आणि आमिर खान (Aamir Khan) थ्री इडियट्सनंतर (3 Idiots) पुन्हा एकदा एकत्र झळकणार आहेत. लाल सिंह चढ्ढामधील आमिरच्या लूकची जोरदार चर्चा आहे.
काही दिवसांपूर्वी करीना, तैमूर आणि सैफ अली खान धरमशाला इथे गेले होते. तिथे सैफ अली खानच्या चित्रपटाचं शूटिंग होतं. शूटिंग पूर्ण झाल्यानंतर सैफ करीना आणि तैमूरनी एकत्र सुट्ट्यांचा आनंद घेतला. तिथे त्यांच्यासोबत करीनाची जवळची मैत्रीण मलायका अरोरादेखील अर्जुन कपूरसोबत आली होती.