चर्चेत आहे करिना कपूरचा हॉट पॅन्टमधला वर्कआउट VIDEO, सोशल मीडियावर होतोय VIRAL

व्हिडीओमध्ये करिना वेगवेगळे व्यायाम प्रकार करताना दिसत तर आहेच शिवाय तिच्या नो-मेकअप लुकचीही चर्चा होताना दिसत आहे.

News18 Lokmat | Updated On: Sep 23, 2019 02:43 PM IST

चर्चेत आहे करिना कपूरचा हॉट पॅन्टमधला वर्कआउट VIDEO, सोशल मीडियावर होतोय VIRAL

मुंबई, 23 सप्टेंबर- करिना कपूर ही बॉलिवूडची ट्रेण्ड सेटर आहे असं म्हटलं तर चुकीचं ठरणार नाही. फिटनेसपासून ते फॅशनपर्यंत करिनाने स्वतःचं असं वेगळं अस्तित्व तयार केलं आहे. ती सोशल मीडियावर नसली तरी तिचे वर्कआऊट करतानाचे अनेक फोटो आणि व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल होत असतात. बॉलिवूडमधील सर्वात फिट अभिनेत्रींपैकी ती एक आहे. नुकताच करिनाचा एक नवा वर्कआउट व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल झाला आहे. यात ती वजन उचलून व्यायाम करताना दिसत आहे.

व्हिडीओमध्ये करिना वेगवेगळे व्यायाम प्रकार करताना दिसत तर आहेच शिवाय तिच्या नो-मेकअप लुकचीही चर्चा होताना दिसत आहे. करिनाचा हा हेवी वर्कआउट व्हिडीओ पाहून तिचे चाहते खूश झाले नसतील तरच नवल. व्हिडीओत करिनाचा स्पोर्ट्स लुक दिसत आहे. तिने काळ्या रंगाची स्पोर्ट्स ब्रासह हॉट पॅन्ट घातली आहे. तिच्या चाहत्यांसाठी हा व्हिडीओ फार मोटिवेशनल असेल यात काही शंका नाही.

 

Loading...

View this post on Instagram

 

A post shared by Kareena Kapoor Khan (@therealkareenakapoor) on

अनेक बॉलिवूड स्टार्स जिम आणि योग क्लासला जाताना दिसतात. ते स्वतः त्यांचे वर्कआउटचे फोटो सोशल मीडियावर सातत्याने शेअर करत असतात. रुपरी पडद्यावर सुंदर दिसण्यासाठी घाम गाळतात. व्यायामासोबतच ते योग्य डाएटही फॉलो करतात. करिनाशिवाय मलायका अरोरा आणि शिल्पा शेट्टीला योग आणि व्यायाम करताना पाहिलं आहे.

करिनाने नुकताच तिचा 39 वा वाढदिवस साजरा केला. यानिमित्ताने करिनाचे जवळचे मित्र आणि कुटुंबिय पतौडी पॅलेसमध्ये गेले होते. करिनाच्या याच बर्थडे पार्टीचे फोटो आणि व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल होत आहेत.

 

View this post on Instagram

 

#birthdayvibes🎉

A post shared by Kareena Kapoor Khan (@therealkareenakapoor) on

करिनाच्या सिनेमांबद्दल बोलायचे झाले तर लवकरच ती अक्षय कुमारसोबत गुड न्यूज सिनेमात दिसणार आहे. याशिवाय ती इरफान खानसोबत अंग्रेजी मीडियम आणि करण जोहरच्या तख्त सिनेमात दिसणार आहे. याशिवाय ती टीव्हीवरील डान्स रिअॅलिटी शो डान्स इंडिया डान्स 7 ची परीक्षण करत आहे.

अदनान सामी म्हणाला, 'मी पाकिस्तानचा द्वेष करत नाही...'

देशमुख कुटुंबातील गृहकलह चव्हाट्यावर, जेनेलियाने रितेशला दिलं सडेतोड उत्तर

अभिनेत्रीने शेअर केला वॉटर डिलीव्हरीचा लाइव्ह फोटो, हा अनुभव तुम्ही वाचाच!

आमिरच्या लेकीने शेअर केला क्लबमधला बोल्ड फोटो, सोशल मीडियावर होताय तुफान VIRAL

VIDEO: 'बादशहाच्या दरबाराला लाथ मारणारा आमचा राजा होता'; पवारांचा उदयनराजेंना टोला

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला आणि टि्वटरवर फाॅलो करा

First Published: Sep 23, 2019 02:42 PM IST
Loading...

ताज्या बातम्या

Loading...