Home /News /entertainment /

'मला या व्यक्तीवर अजूनही क्रश आहे' करीना कपूरने स्वत:च केला खुलासा

'मला या व्यक्तीवर अजूनही क्रश आहे' करीना कपूरने स्वत:च केला खुलासा

करीना कपूरला खानला (Kareena Kapoor Khan) आजही एका व्यक्तीवर क्रश आहे. तिने स्वत:च याबाबत खुलासा केला. करीना आणि त्या व्यक्तीमध्ये बरचसं साम्यदेखील आहे.

  मुंबई, 19 डिसेंबर: बॉलिवूड अभिनेत्री करीना कपूर खान (Kareena Kapoor Khan) सध्या तिच्या प्रेग्नंसीमुळे चर्चेत आली आहे. बेबो नेहमीच नव-नवीन फोटो सोशल मीडियावर शेअर करत असते. ज्या करीना कपूरचे अख्या देशातच नाही तर जगातही अनेक चाहते आहेत ती सुद्धा काही व्यक्तींची फॅन आहे. करीनाने नुकताच आपल्या वुमन क्रशबद्दल खुलासा केला आहे. बेबोला कोणावर क्रश आहे? करीनाने आपल्या वुमन क्रशबद्दल माहिती देताना सांगितलं, ‘पेनेलोपे क्रूझवर (Penélope Cruz)मला क्रश आहे.’ ही एक स्पॅनिश अभिनेत्री आणि मॉडेल आहे. क्रूझला ऑस्कर पुरस्काराने सन्मानित करण्यात आलं आहे. पेनेलोपे आणि करीनामध्ये काही सामान्य गुण आहेत. दोघीही आपआपल्या करीअरमध्ये अतिशय यशस्वी झाल्या आहे आणि दोघींच्या स्वभावातही बरंच साम्य आहे.  फेब्रुवारीमध्ये करीना कपूर पुन्हा एकदा आई होणार आहे. अलीकडेच ती तिचा पती सैफ अली खान आणि मुलगा तैमूरसमवेत धर्मशाला इथे फिरायला गेली होती, तिथे सैफ अली खान त्याच्या पुढच्या चित्रपटाचे शूटिंग करत होता.
  बेबोचे आगामी चित्रपट वर्कफ्रंटबद्दल बोलायचं झालं तर, करीना कपूर आमिर खानसमवेत 'लालसिंग चड्ढा' चित्रपटात दिसणार आहे. ऑक्टोबरमध्ये तिनं शूटिंग पूर्ण केलं आहे. या चित्रपटाशिवाय करीना कपूर करण जोहरच्या मल्टीस्टारर फिल्म 'तख्त' मध्ये काम करताना दिसणार आहे.
  Published by:Amruta Abhyankar
  First published:

  Tags: Bollywood actress, Kareena Kapoor

  पुढील बातम्या