सैफने दिली Good News; करीना दुसऱ्यांदा होणार आई

सैफने दिली Good News; करीना दुसऱ्यांदा होणार आई

मीडियाचं प्रचंड आकर्षण मिळत असलेल्या तैमूर अली खाननंतर (Taimur ali khan) आता आपण आणखी एका पाहुण्याला कुटुंबात स्थान देण्यासाठी उत्सुक असल्याचं सैफ आणि करिनाने जाहीर केलं आहे.

  • Share this:

मुंबई, 12 ऑगस्ट : सैफ अली खान (saif ali khan) आणि करीना कपूर खान (kareena kapoor Khan) या सेलेब्रिटी जोडीने एक गुड न्यूज दिली आहे.  मीडियाचं प्रचंड आकर्षण मिळत असलेल्या तैमूर अली खाननंतर (Taimur ali khan)आता आपण आणखी एका पाहुण्याला कुटुंबात स्थान देण्यासाठी उत्सुक असल्याचं सैफ आणि करीनाने जाहीर केलं आहे. गेले कित्येक दिवस बॉलिवूडमध्ये करिना पुन्हा आई होणार असल्याची (Second baby) चर्चा सुरू होती. सैफ आणि करीनाने आता नव्या पाहुण्याच्या आगमानाची चाहूल असल्याचं अधिकृतपणे जाहीर केलं आहे.

सैफ अली खान आणि करिना यांचा मुलगा तैमूर अली खान याच्या जन्मानंतर काही दिवस करिनाने चित्रपटसृष्टीतून ब्रेक घेतला होता. त्यानंतर तिचं धडाक्यात पुनरागमनही झालं. आपण पुन्हा एकदा तिने आई व्हायचा निर्णय घेऊ शकतो, असं ती काही मुलाखतींमधून सांगत होती. आता सैफ आणि करीनाने दुसऱ्यांदा ती गोड बातमी शेअर केली आहे.

आमच्या कुटुंबात नवा पाहुणा येणार आहे, हे जाहीर करताना आम्हाला आनंद होतो आहे. आमच्यावर प्रेम करणाऱ्या आणि पाठिंबा देणाऱ्या सर्व हितचिंतकांचे आभार, असा संदेश सैफ आणि करीनाने जाहीर केला आहे.

करीना कपूर दुसऱ्यांना गरोदर असल्याच्या बातम्या काही बॉलिवूड इनलायडर्सच्या हवाल्याने दिल्या जात होत्या. पण त्याला अधिकृतरीत्या पुष्टी आज मिळाली. स्वतः सैफ आणि करीनानेच ही गोड बातमी शेअर केली आहे.

Published by: अरुंधती रानडे जोशी
First published: August 12, 2020, 4:34 PM IST
Tags:

ताज्या बातम्या

corona virus btn
corona virus btn
Loading