मुंबई, 24 डिसेंबर- करीना कपूर खान (Kareena Kapoor Khan) सध्या कोरोनाशी (Coronavirus) लढा देत आहे. कुटुंबापासून दूर असलेली करीना सध्या क्वारंटाईनमध्ये आहे. तिने 12 दिवस क्वारंटाईन पूर्ण केले आहे. या सगळ्यात आता करीना आणि तिच्या चाहत्यांसाठी एक दिलासादायक बातमी समोर आली आहे. बेबो कोविड 19 पॉझिटिव्ह आल्यानंतर, तिची ओमिक्रॉनची जीनोम सिक्वेन्सिंग चाचणी झाली. ज्याचा रिपोर्ट (Kareena Kapoor Khan Omicron test report) आला आहे.
करीना कपूर खानचा सिक्वेन्सिंग ओमिक्रॉन रिपोर्ट निगेटिव्ह
करीना कपूर खानमध्ये ओमिक्रॉनची लक्षणे आढळलेली नाहीत. बेबोचा जीनोम सिक्वेन्सिंग चाचणी अहवाल निगेटिव्ह आला आहे. करीना कपूर व्यतिरिक्त अमृता अरोरा, महीप कपूर, सीमा खान देखील ओमिक्रॉन संसर्गापासून सुरक्षित आहेत. करिनासह इतरांची ओमिक्रॉनची जीनोम सिक्वेन्सिंग चाचणी झाली होती.
वाचा-शाहरुख खानने सुरु केलं 'Tiger 3' चं शूटिंग; किंग खानचा जबरदस्त LOOK VIRAL
13 डिसेंबरला करीनाला झाली होती कोरोनाची लागण
13 डिसेंबर रोजी करीना कोरोना पॉझिटिव्ह आढळून आली होते. रिपोर्ट आल्यानंतर तिने कोरोनाच्या नियमांचे पालन करत कुटुंब आणि मुलांपासून स्वतःला क्वारंटाइन केले होते. क्वारंटाईनमध्ये तिला तिची मुले तैमूर आणि जेहची खूप आठवण येत होती.
करीना क्वारंटाइन फूडचा घेत आहे आनंद
आयसोलेशनमध्ये राहून करीना चाहत्यांना तिच्या तब्येतीचे अपडेट्स सतत देत असते. अलीकडेच तिने चाहत्यांसाठी पुन्हा एकदा एक नवीन पोस्ट शेअर केली आहे. करीना कपूरने इन्स्टा स्टोरीमध्ये एक फोटो शेअर केला आहे. यामध्ये जेवणाने भगलेली एक प्लेट दिसत आहे. ज्यामध्ये हिरव्या भाज्या, कॉर्न ब्रेड आणि बटर दिसत आहे. क्वारंटाईन फूडचा आस्वाद घेत असताना करीना लिहिते की, 'मी बटर खाणे कधीच थांबवू शकत नाही.'
मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.
Tags: Bollywood News, Corona, Entertainment, Kareena Kapoor, Marathi entertainment