Home /News /entertainment /

मलायकाच्या बहिणीची बर्थडे पार्टी, चर्चा मात्र करिना-अर्जुनच्या फोटोची

मलायकाच्या बहिणीची बर्थडे पार्टी, चर्चा मात्र करिना-अर्जुनच्या फोटोची

मालायकाची बहीण अमृता अरोराच्या बर्थडे पार्टीमध्ये अर्जुन कपूरनं हजेरी लावली. यावेळचे त्यांचे काही फोटो सध्या सोशल मीडियावर व्हायरल झाले.

  मुंबई, 02 फेब्रुवारी : अभिनेत्री मलायका अरोरा आणि अर्जुन कपूर यांचं नातं आता कोणापासून लपलेलं नाही. हे दोघंही आता अनेक फंक्शनला एकत्र दिसतात. मात्र असं असतानाही हे दोघंही त्यांचं पर्सनल लाइफ कधी उघड करत नाहीत. नुकतंच मालायकाची बहीण अमृता अरोराच्या बर्थडे पार्टीमध्ये अर्जुन कपूरनं हजेरी लावली. यावेळचे त्यांचे काही फोटो सध्या सोशल मीडियावर व्हायरल झाले. ज्यात अर्जुन कपूर मलायका नाही तर त्याची ऑनस्क्रीन पत्नी करिना कापूरसोबत एन्जॉय करताना दिसत आहे. अर्जुन कपूर आणि करिना यांनी 'की अँड का' या सिनेमात एकत्र काम केलं होतं. अशात आता अर्जुन करिनासोबत एक मजेशीर फोटो शेअर केला आहे. ज्यात करिना अर्जुनच्या पाठीवर झुकलेली दिसत आहे.
  View this post on Instagram

  Blow a kiss 😘 , Fire a gun 🔫 Bebo’s always got Me to Lean On 😉

  A post shared by Arjun Kapoor (@arjunkapoor) on

  या पार्टीतील आणखी काही फोटो समोर आले आहेत. ज्यात मलायका आणि अर्जुन दोघंही तिच्या मैत्रिणींसोबत धम्माल मस्ती करताना दिसत आहेत. या पार्टीमध्ये मलायकानं सिक्वेस्ड ड्रेस घातला आहे. तर करिना अनिमल प्रिंट जम्पसूटमध्ये खूपच ग्लॅमरस दिसत आहे.
  वर्कफ्रंट बद्दल बोलायचं तर मागच्या वर्षीच्या शेवटी करिनाचा गुड न्यूज हा सिनेमा रिलीज झाला होता. या सिनेमात तिनं अक्षय कुमार सोबत स्क्रीन शेअर केली होती. राज मेहता दिग्दर्शित या सिनेमानं 200 कोटींपेक्षा जास्त कमाई केली. याशिवाय करिनाकडे 'अंग्रेजी मिडियम' आणि 'लाल सिंह चड्डा' या सिनेमात दिसणार आहे. नेहा-आदित्य गोव्यात करणार डेस्टिनेशन वेडिंग? बीचवरील PHOTO VIRAL
  Published by:Suraj Yadav
  First published:

  Tags: Arjun kapoor, Kareena Kapoor, Malaika arora

  पुढील बातम्या