मुंबई, 11 मे : बॉलिवूडची फर्स्ट फॅमिली म्हणून ओळखलं जाणाऱ्या कपूर घराण्याच्या लेकींची अर्थात करिना आणि करिश्मा कपूर यांच्या नावाची चर्चा तर बॉलिवूडमध्ये नेहमीच होताना दिसते. सोशल मीडियावर नेहमीच चर्चेत राहणाऱ्या या कपूर सिस्टर्सनी अद्याप एकाही सिनेमात एकत्र काम केलेलं नाही. पण या दोघींचे थ्रोबॅक फोटो मात्र नेहमीच सोशल मीडियावर व्हायरल होताना दिसत असतात. सध्या या दोघींचा एक फोटो सोशल मीडियावर व्हायरल होत आहे. ज्यात करिना आणि करिश्मा कपूरला ओळखणं सुद्धा कठीण झालं आहे.
सोशल मीडियावर व्हायरल होणाऱ्या या फोटोमध्ये या दोन्ही बहिणी ट्रॅडिशनल लुकमध्ये दिसत आहे. ज्यात करिनाचा चुबी अवतार पाहायला मिळत आहे. हा फोटो करिनानं बॉलिवूडमध्ये पदार्पण करण्याआधीचा हा फोटो आहे. यात करिना हातांना मेहंदी आणि गोल्डन कलरच्या बांगड्यामध्ये दिसत आहे. याशिवाय यामध्ये या दोघींसोबत त्यांची आई आणि अभिनेत्री बबीता सुद्धा दिसत आहे. मागच्या काही दिवासांपासून या दोघींचे जुने फोटो अनेकदा व्हायरल झालेले पाहायला मिळत आहेत.
दोन्ही बहिणींच्या बॉलिवू़ड करिअर बद्दल बोलायचं तर करिश्मा मागच्या बऱ्याच वर्षांपासू सिनेमांपासून दूर आहे. मात्र 90 च्या दशकात तिनं अनेक ब्लॉकबस्टर सिनेमा दिले होते. तर करिनाला आता या इंडस्ट्रीमध्ये 20 पेक्षा जास्त वर्ष झाली आहेत. पण एवढ्या वर्षात या दोघींनी एकत्र कधीच काम केलं नाही. दरम्यान 2001 मध्ये 'जुबैदा' सिनेमाच्या सिक्वेलसाठी करिना-करिश्माला विचारण्यात आलं होतं मात्र त्यानंतर या सिनेमाबाबत काहीच अपडेट मिळले नाही.
मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.
Tags: Bollywood, Kareena Kapoor