मुंबई, 18 जुलै : अभिनेत्री करिना कपूर (kareena kapoor) फिटनेस फ्रिक असली तर खाण्याच्या बाबतीतही ती मागे नाही हे सर्वांनाच माहिती आहे. करिना आपल्या सोशल मीडियावर खाद्यपदार्थांचे फोटो शेअर करते. करिनाला नॉनव्हेजही खूप आवडतं आणि आता तिनं आपल्या सोशल मीडियावर फिश करीचा (Fish curry) फोटो शेअर केला आहे आणि सर्वात बेस्ट फिश करी असल्याचं करिना म्हणाली आहे.
करिनाच्या आवडत्या शेफने तिच्यासाठी ही खास फिश करी बनवली. मग काय करिनाने या माशाच्या कालवणावर चांगलाच ताव मारला.
करिनासाठी खास फिश करी तयार केली होती ती अभिनेत्री मलायका अरोराच्या आईने (malaika arora). करिनाला ही फिश करी इतकी आवडली की अशी फिश करी कुठेच नाही, असं म्हणत तिनं कौतुक केलं आहे. अशी फिश करी खाताना थांबूच शकत नाही असं करिना म्हणाली. करिनाला फिश करी खाताना स्वत:च्या जिभेवर ताबा ठेवू शकली नाही.

करिनाने इन्स्टाग्राम स्टोरीवर या फिश करीचा फोटो शेअर केला आहे. "#CantStopWontStop द बेस्ट फिश करी इन टाऊन. धन्यवाद जॉयस अरोरा. लव्ह यू", असं कॅप्शनही करिनाने या इन्स्टा स्टोरीला दिलं आहे.
हे वाचा - आता अशी दिसते 'बजरंगी भाईजान'ची मुन्नी; 5 वर्षात किती बदलला लूक पाहा PHOTO
जॉयस अरोरा म्हणजे मलायका आणि अमृता अरोराची आई. जॉयस अरोरा या शेफ आहेत. त्यांचं स्वत:चं इन्स्टाग्राम अकाऊंटही आहे, जिथं त्या आपल्या रेसिपी शेअर करतात, रेसिपी टीप्सही देतात. आता त्यांनी बनवलेल्या फिश करीचा फोटो करिना कपूरने आपल्या इन्स्टाग्राम अकाऊंटवर शेअर केला. करिनाने इन्स्टा स्टोरीवर हा फोटो ठेवला.
करिना कपूर, करिश्मा कपूर, मलायका अरोरा आणि अमृता अरोरा यांची मैत्री बॉलिवूडमधील सर्वात प्रसिद्ध अशी मैत्री. एकमेकांच्या महत्त्वाच्या क्षणात कपूर आणि अरोरा सिस्टर्स नेहमी एकमेकांसोबत असतात.
संपादन - प्रिया लाड
मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर.
आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.