दुसऱ्यांदा आई झाल्यानंतरही करीना नाही विसरली सावत्र मुलाचा वाढदिवस; दिल्या खास शुभेच्छा

दुसऱ्यांदा आई झाल्यानंतरही करीना नाही विसरली सावत्र मुलाचा वाढदिवस; दिल्या खास शुभेच्छा

Kareena Kapoor Birthday wish to Ibrahim: करीना कपूर खान आपल्या दुसर्‍या मुलाच्या जन्मानंतरही इब्राहिमचा वाढदिवस ( Ibrahim ali khan khan birthday) विसरली नाही. तिने खास पद्धतीने इब्राहिमला शुभेच्छा दिल्या आहेत.

  • Share this:

मुंबई, 05 मार्च: बॉलिवूड अभिनेत्री करीना कपूर खानने (Kareena Kapoor Khan) नुकत्याच आपल्या दुसऱ्या मुलाला जन्म दिला आहे. सैफ अली खान (Saif Ali khan) चौथ्यांदा बाबा झाला आहे. दुसर्‍या मुलाला जन्म दिल्यानंतरही करीना कपूर सोशल मीडियावर (Social Media) खूप अ‍ॅक्टिव्ह आहे. अलीकडेच, तिने प्रसूतीनंतरचा तिचा पहिला सेल्फी शेअर केला होता, ज्यामध्ये ती उन्हात बसलेली दिसली होती. दुसर्‍या मुलाच्या जन्मानंतरही करीना इब्राहिमचा वाढदिवस ( Ibrahim Ali Khan birthday) विसरली नाही. तिने खास पद्धतीने त्याला शुभेच्छा दिल्या आहेत.

आज सैफ अली खानचा मोठा मुलगा इब्राहिम अली खानचा वाढदिवस आहे. करीना कपूर खाननेही आपला सावत्र मुलगा इब्राहिमला वाढदिवसाच्या शुभेच्छा दिल्या आहेत. करीनाने तिच्या इंस्टाग्राम स्टोरीवर इब्राहिमचा एक फोटो शेअर केला आहे. ज्यामध्ये तिने कॅप्शनमध्ये लिहिलं आहे की- 'हे गुड लुकिंग. वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा हॅन्डसम.' इब्राहिमचा हा ब्लॅक अँड व्हाइट फोटो त्याच्या चाहत्यांच्या विशेष पसंतीस उतरला आहे. बऱ्याच युजर्सनी प्रतिक्रिया देवून इब्राहिमला वाढदिवसाच्या शुभेच्छा दिल्या आहेत.

ibrahim ali khan, happy birthday ibrahim ali khan

अमृता सिंग (Amruta singh) आणि सैफ अली खान यांचा मुलगा इब्राहिमचा आज 20 वा वाढदिवस आहे. इब्राहिमची बहीण आणि बॉलिवूड अभिनेत्री सारा अली खाननेही (Sara ali khan) तिच्या धाकट्या भावाला वाढदिवसाच्या शुभेच्छा दिल्या आहेत. तिने इब्राहिमसोबतचे अनेक फोटो सोशल मीडियावर शेअर केली आहेत. ज्यामध्ये सारा आपल्या भावासोबत चहा पिताना दिसत आहे. तर दुसऱ्या एका फोटोत सारा आपल्या लहान भावाला घास भरवताना दिसत आहे. या फोटोंसह साराने इब्राहिमसाठी एक खास संदेशही लिहिला आहे. तिचे हे फोटो सोशल मीडियावर व्हायरल होत आहेत.

हे ही वाचा -फाटक्या जीन्सवर टीका केल्यानंतर कंगना रणौतला नेटकऱ्यांनीच दाखवला आरसा

अलीकडेच करीना कपूर खानने आपल्या दुसऱ्या मुलाला जास्त वेळ देता यावा, म्हणून आपली सर्व कामं प्रेगन्सीपूर्वी आटोपली आहेत. तिने प्रेगन्सीपूर्वी अनेक चित्रपटांचं शूटिंग पूर्ण करून घेतलं आहे. यावर्षी बॉलिवूडमधील अनेक महत्त्वाचे तिच्याकडे आहेत.

Published by: News18 Desk
First published: March 5, 2021, 2:07 PM IST

ताज्या बातम्या