VIDEO : करिनाच्या शोमध्येच सासू शर्मिला टागोरनी समजावला मुलगी आणि सूनेमधील फरक

VIDEO : करिनाच्या शोमध्येच सासू शर्मिला टागोरनी समजावला मुलगी आणि सूनेमधील फरक

शर्मिला टागोर आणि करिना कपूर खान यांच्यातील सासू-सूनेचं नातं कसं आहे हे फार कमी लोकांना माहित आहे.

  • Share this:

मुंबई, 13 डिसेंबर : करिना कपूर खान सध्या तिच्या सिनेमासोबतच तिचा रेडिओ शो ‘व्हॉट वुमेन वॉन्ट’मुळे सुद्धा चर्चेत असते. या शोचा दुसरा सीझन नुकताच सुरू झाला असून त्याच्या पहिल्याच एपिसोडमध्ये करिनाच्या सासू आणि जेष्ठ अभिनेत्री शर्मिला टागोर यांनी हजेरी लावली. सासूसोबत काम करण्याची करिनाची ही पहिलीच वेळ आहे. दरम्यान या शोमध्ये एका प्रश्नाचं उत्तर देताना शर्मिला टागोर यांनी करिनाला मुलगी आणि सूनेतील फरक समजावून सांगितला.

करिनानं शर्मिला यांना विचारला हा प्रश्न तिच्या प्रेक्षकांकडून सुचवण्यात आला होता. सासू आणि मुलीमध्ये शर्मिला टागोर यांच्या मते काय फरक आहे. हाच प्रश्न करिनानं त्यांना विचारला आणि त्यांनीही तिला या दोन्हीतील फरक समजावून सांगितला. त्या म्हणाल्या, ‘खरं तर मुलगी तुमच्यासोबत तिच्या बालपणापासून राहत असते त्यामुळे तुम्हाला तिच्या आवडी-निवडी माहित असतात, तिला काय आवडतं काय नाही हे माहित असतं. तिचं वागणं माहित असतं तिचा स्वभाव माहित असतो. त्यामुळे या सगळ्यासाठी तुम्ही आधीच तयार असता.’

मराठमोळ्या स्मिता पाटील यांनी बदलला बॉलिवूड सिनेमांचा चेहरा!

शर्मिला पुढे म्हणाल्या, मुलीबद्दल तुम्हाला सर्व माहित असतं मात्र सूनेचं तसं नसतं. ती तुमच्या घरी येते तेव्हा ती मोठी झालेली असते. त्यामुळे तुम्हाला तिच्या बद्दल फारसं काही माहित नसतं. त्यामुळे या नात्याला तुम्ही वेळ द्यायला हवा. नवी मुलगी जेव्हा तुमच्या घरी येते तेव्हा तुम्ही प्रेमानं तिचं स्वागत करायला हवं, तिला त्या घरात कम्फर्टेबल वाटावं यासाठी प्रयत्न करायला हवे.

दीपिकानं सांगितलं गुपित, धोनी नाही तर ‘हा’ आहे आवडता क्रिकेटपटू!

शर्मिला सांगतात, जेव्हा जेव्हा सून तुमच्या घरी येते त्यावेळी तिच्या खासगी आयुष्यात जास्त ढवळाढवळ करू नये. कारण ते नातं नवीन असतं, ज्याला तयार व्हायला वेळ लागतो. यावेळी त्यांनी त्याच्या लग्नानंतरच्या आठवणींना उजाळा दिला. त्या म्हणाल्या, जेव्हा मी लग्न होऊन जेव्हा या घरी आले होते त्यावेळी मला अनेक गोष्टी जुळवून घ्याव्या लागल्या होत्या. जेवणाच्या सवयी, मला भात आणि मासे आवडत असत. तर पतौडी घराण्यात या दोन्ही गोष्टी अजिबात खाल्ल्या जात नाहीत. लग्नानंतर अर्थातच माझ्या कामावरही परिणाम झाला. मला 'खिलौने', 'हाथी मेरे साथी', 'तेरे मेरे सपने' सारखे सिनेमे सोडावे लागले. कारण तुमच्याकडे 24 तास असतात आणि तुम्हाला त्यात सर्व गोष्टी करायच्या असतात अशात घर आणि काम दोन्ही सांभाळताना तारेवरची कसरत करावी लागते.

करिना कपूरच्या या शोमध्ये तिचा पती सैफ सुद्धा दिसणार आहे. करिना शर्मिला टागोर यांचा मुलगा सैफची दुसरी पत्नी आहे. पहिली पत्नी अमृता सिंहला घटस्फोट दिल्यानंतर सैफनं करिनाशी लग्न केलं.

बॉलिवूडचा मिस्टर परफेक्शनिस्ट अशी घेतो फिटनेसची काळजी!

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला आणि टि्वटरवर फाॅलो करा

First Published: Dec 13, 2019 11:44 AM IST

ताज्या बातम्या